एक्स्प्लोर

IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट! क्रिकेट चाहत्यांसाठी चिंतेची बाब

World Cup 2023 : विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडिया (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) दोन्ही संघांनी आतापर्यंतचे प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत. आज एका संघाच्या विजयी वाटचालीमध्ये खंड पडणार आहे.

IND vs NZ Weather Report : एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) मधील 21 वा सामना आज भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघामध्ये रंगणार आहे. धर्मशाला (Dharamshala) येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडिअम (Himachal Pradesh Cricket Stadium) मैदानावर दोन्ही संघ आपापसांत भिडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आज एका संघाच्या विजयी वाटचालीमध्ये खंड पडणार आहे. कारण, दोन्ही संघांनी वर्ल्ड कप 2023 मधील आतापर्यंतच्या प्रत्येकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही संघ सलग पाचव्या विजयासाठी आज मैदानात उतरणार आहेत. मात्र, चाहत्यांसाठी एक चिंतेची बाब म्हणजे आजच्या सामन्यावर पावसाचं सावट (Rain Prediction) आहे.

धर्मशालेत पाऊस पडणार?

अ‍ॅक्यू वेचर (Accuweather) च्या रिपोर्टनुसार, पावसामुळे आज भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट आहे. आजच्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. अ‍ॅक्यू वेचरच्या रिपोर्टनुसार, धर्मशालेत पाऊस पडण्याची (Dharamshala Weather Update) शक्यता 40 टक्के आहे. दुपारच्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहू शकते. तर, संध्याकाळी पावसाची शक्यता कमी आहे. पण तापमान सुमारे 12-13 अंशांच्या आसपास घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यातील धर्मशाला येथे खेळवण्यात आलेला मागील सामना देखील पावसामुळे प्रभावित झाला होता. पाऊस पडल्यामुळे हा सामना फक्त 43 षटकांचा खेळवण्यात आला होता.

विश्वचषकातील दोन्ही संघांची आकडेवारी

2019 मध्ये विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही संघांमधला शेवटचा सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव करून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्याशिवाय 2003 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारताने शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला होता. टीम इंडियाविरोधात न्यूझीलंडचं पारडं काहीसं जड आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये एकूण 9 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडने 5 आणि भारताने 3 सामने जिंकले आहेत. तर, एक सामना अनिर्णित राहिला होता.

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना 21
  • दिनांक आणि वेळ  : रविवार, 22 ऑक्टोबर, दुपारी 2 वाजता
  • ठिकाण : एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला

महत्वाच्या इतर बातम्या :

Ishan Kishan and Suryakumar Yadav: टीम इंडियाला दुहेरी झटका; ईशान, सूर्याही आजच्या सामन्यातून बाहेर?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :18 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Embed widget