एक्स्प्लोर

Morning Headlines 21st December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

IPL 2024, Rohit Sharma: रोहित आता मुंबईतून नाही धोनीच्या चेन्नईतून खेळणार? चेन्नईच्या संघाकडून मोठं वक्तव्य, मुंबईच्या ताफ्यात खळबळ

Rohit Sharma Future After IPL Auction 2024: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2024 साठी मिनी लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये पार पडला. आता आयपीएलच्या सीझनची (IPL 2024) तयारी सुरू झाली आहे.  आयपीएलचा आगामी सीझन मार्च ते मे दरम्यान खेळवला जाऊ शकतो, असा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. यंदाचा आयपीएल सीझन अनेक वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत आहे. त्यापैकी एक म्हणजे, मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) 5 वेळा चॅम्पियन बनवणारा माजी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधार पदावरुन हटवणं आणि त्याच्याऐवजी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कर्णधार पद सोपवणं. वाचा सविस्तर 

वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू गुन्हेगारी कलमातून वगळला जाणार; केंद्रीय गृहमंत्र्यांची संसदेत घोषणा, डॉक्टरांकडून निर्णयाचं स्वागत

Amendment To BNS Bill: बुलढाणा : सध्या देशभरात वैद्यकीय क्षेत्रात (Medical Field) एखाद्या डॉक्टरनं (Doctors) निष्काळजीपणा केला आणि त्यामुळे जर रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्या डॉक्टरवर भारतीय दंड संहितेच्या कलम 304 A नुसार गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होत होता. या सर्व बाबींकडे डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशननं अनेकदा सरकारचं लक्ष वेधलं होतं. याचीच दखल घेत आता या कायद्यात बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर 

4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना 'हे' कफ सिरप देऊच नका; DCGI चा फार्मास्युटिकल कंपन्यांना इशारा

DCGI Drug Regulator Warns: नवी दिल्ली : भारताच्या औषध नियामक (DCGI) नं चार वर्षांच्याखालील मुलांसाठी सर्दी आणि खोकल्याचं कफ सिरप (Cough Syrup) वापरण्यावर बंदी घालण्याचे निर्देश जारी केले आहेत. DCGI नं 18 डिसेंबर रोजी सर्व राज्यांना पत्र लिहून क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन या दोन औषधांच्या कॉकटेलचा वापर करून तयार केलेल्या सिरपच्या पॅकेजिंगवर लेबल लावण्यास सांगितलं आहे. वाचा सविस्तर 

Insulin : मधुमेही रुग्णांना आता 100 टक्के देशी इन्सुलिन मिळणार, किंमतही स्वस्त

Made in India Insulin : भारतातील मधुमेही रुग्णांना आनंदाची बातमी आहे. मधुमेहाच्या रुग्णांना आता देशी इन्सुलिन मिळणार आणि तीही स्वस्त दरात मिळणार असल्याने ही दिलासा देणारी बातमी आहे. टाइप वन आणि काही टाइप टू मधुमेहाच्या रुग्णांना दररोज इन्सुलिनची आवश्यकता असते. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे रुग्ण दिवसातून अनेक वेळा इन्सुलिन घेतात. आता त्यांना मेक इन इंडिया तंत्रज्ञानाने बनवलेले स्वदेशी इन्सुलिन मिळणार आहे. वाचा सविस्तर 

"फक्त चहा-बिस्किटांवर मिटींग संपली, समोसा मिळालाच नाही"; JDU खासदारानं I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीबाबत व्यक्त केली खंत

JDU MP On I.N.D.I.A Meeting: नवी दिल्ली : भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकजूट बांधली आहे. विरोधकांच्या याच इंडिया आघाडीची (I.N.D.I.A Alliance) चौथी बैठक मंगळवारी (19 डिसेंबर) दिल्लीत (Delhi) पार पडली. या बैठकीला इंडिया आघाडीत (I.N.D.I.A Alliance Meeting) सहभागी असलेल्या जवळपास सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीला ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav), नितीश कुमार (Nitish Kumar) आणि अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेस (Congress) नेते ही बैठक यशस्वी असल्याचं म्हणत आहेत, पण नितीशकुमार यांच्या जेडीयूनं (JDU) मात्र वेगळाच सूर लावला आहे. वाचा सविस्तर 

Weather Update : तमिळनाडूमध्ये पावसाचा कहर! धुके आणि बर्फवृष्टीने उत्तर भारत गारठला; आजचं हवामान कसं असेल?

Weather Update Today : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे दक्षिण भारतात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. मुसळधार पावसामुळे तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) तामिळनाडूमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. जम्मू आणि काश्मीरसह पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तर भारतात पारा घसरला आहे. दिल्लीत बुधवारी सकाळी पारा 22 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. वाचा सविस्तर 

21 December In History: अनंत कान्हेरेने जॅक्सनला गोळ्या घातल्या, रेडिअमचा शोध, गोविंदाचा जन्म; आज इतिहासात 

मुंबई: ब्रिटिशांना हादरवणाऱ्या घटनांपैकी एक घटना म्हणजे नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या. इतिहासात आजच्याच दिवशी अनंत कान्हेरे याने गोळ्या घालून जॅक्सनची हत्या केली. तसेच विज्ञान क्षेत्रातल्या महत्त्वाच्या शोधांपैकी एक असलेल्या रेडिअमचा शोधही (Discovery of Radium) आजच्याच दिवशी लागला होता.  तसेच प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा आजच्याच दिवशी जन्म झाला. वाचा सविस्तर 

Horoscope Today 21 December 2023 : आजचा गुरुवार खास! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 December 2023 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 21 डिसेंबर 2023, रोजी गुरुवार महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीचे लोक आज मोठ्या चपळाईने आपले काम पूर्ण करतील. व्यापाऱ्यांबाबत बोलायचे झाले तर, आज किरकोळ व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. आज कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या दिनचर्येत बदल करावे लागतील. समाजात प्रत्येकाला समान मान मिळायला हवा. सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Marathi Serial Updates Tu Bhetashi Navyane : छोट्या पडद्यावर  नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
छोट्या पडद्यावर नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमकTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM :  ABP MajhaABP Majha Headlines :  10:00AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGanpatipule Beach: गणपतीपुळे समुद्रकिनारी गर्दी; प्रशासनाकडून सतर्कतेचे फलक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Marathi Serial Updates Tu Bhetashi Navyane : छोट्या पडद्यावर  नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
छोट्या पडद्यावर नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
NEET Paper Leak Case : मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक; फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या, इतर दोघांचा शोध सुरू
नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक; फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या, इतर दोघांचा शोध सुरू
MLC Election : काँग्रेस नेते विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत, विधानपरिषदेवर कुणाला संधी,  कोणत्या नेत्यांची नावं चर्चेत?
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत, विधानपरिषदेचा फैसला होणार? कुणाला संधी
Munjya Box Office Collection Day 18 :  बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरेना,  18 व्या दिवशी किती केली कमाई?
बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरेना, 18 व्या दिवशी किती केली कमाई?
Pirates Of the Caribbean actor Tamayo Perry Dies :  सर्फिंग करताना शार्कचा हल्ला, अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा...
सर्फिंग करताना शार्कचा हल्ला, अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा...
Embed widget