एक्स्प्लोर

IPL 2024, Rohit Sharma: रोहित आता मुंबईतून नाही धोनीच्या चेन्नईतून खेळणार? चेन्नईच्या संघाकडून मोठं वक्तव्य, मुंबईच्या ताफ्यात खळबळ

Rohit Sharma : रोहित शर्मा आता चेन्नईतून खेळणार? अशा चर्चा सध्या सुरू आहेत. अशातच याबाबत चेन्नईच्या संघाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. चेन्नईच्या संघ प्रशासनाच्या वक्तव्यामुळे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात खळबळ उडाली आहे.

Rohit Sharma Future After IPL Auction 2024: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2024 साठी मिनी लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये पार पडला. आता आयपीएलच्या सीझनची (IPL 2024) तयारी सुरू झाली आहे.  आयपीएलचा आगामी सीझन मार्च ते मे दरम्यान खेळवला जाऊ शकतो, असा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. यंदाचा आयपीएल सीझन अनेक वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत आहे. त्यापैकी एक म्हणजे, मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) 5 वेळा चॅम्पियन बनवणारा माजी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधार पदावरुन हटवणं आणि त्याच्याऐवजी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कर्णधार पद सोपवणं. 

मुंबई फ्रँचायझीनं अलीकडेच रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. अशा स्थितीत ट्रेड विंडोदरम्यान रोहित मुंबईचा संघ सोडणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान, काही चाहते आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं आहे की, रोहित ट्रेड विंडो अंतर्गत चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघात जाऊ शकतो. आता काय खरं? आणि काय खोटं? याबाबत मात्र रोहित शर्माकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. अशातच याबाबत चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) मात्र स्पष्टीकरणं देण्यात आलं आहे. 

चेन्नईचं रोहितबाबत मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण 

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर चेन्नईची संपूर्ण धुरा आहे. अशातच आयपीएलच्या इतिहासातीस सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला रोहित शर्माही धोनीच्या ताफ्यात सामील होणार म्हटल्यावर अलभ्य लाभ, अशा चर्चा सुरू आहेत. अशातच यावर चेन्नई सुपर किंग्सकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. रोहित शर्मा चेन्नईच्या ताफ्यात सहभागी होणार असल्याच्या सर्व चर्चा चेन्नईच्या संघ प्रशासनानं फेटाळून लावल्या आहेत. फ्रँचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी लिलावाच्या वेळी बोलताना सांगितलं की, त्यांची टीम रोहितला घेण्याच्या मूडमध्ये नाही. या सर्व बातम्या अफवा आहेत. 

विश्वनाथन पुढे बोलताना म्हणाले की, "मुख्यतः आम्ही खेळाडूंचा व्यापार करत नाही आणि आमच्याकडे मुंबई इंडियन्ससोबत व्यापार करण्यासाठी खेळाडूही नाहीत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला नाही आणि आमचा तसा कुठलाही हेतू नाही. चेन्नई संघ एमआय खेळाडूंचा व्यापार करू पाहत असल्याच्या मीडियामधील चर्चांचंही त्यांनी यावेळी खंडन केलं आहे. 

रोहित, सूर्या आणि बुमराह मुंबईच्याच ताफ्यात 

मुंबई इंडियन्सशी संबंधित एका अधिकाऱ्यानं 'क्रिकबझ' वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्याबाबत काही अनावश्यक चर्चा सध्या सुरू आहेत. पण महत्त्वाची बातमी म्हणजे, ते कुठेही जात नसून मुंबई इंडियन्स या सर्व खेळाडूंनासोबत ठेवणार आहे. तसेच, पुढे बोलताना या अधिकाऱ्यानं आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीवर वक्तव्य केलं. ते म्हणाले की, आगामी आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, सर्व खेळाडूंची संमती घेण्यात आली होती. ज्यामध्ये स्वतः रोहित शर्माचाही समावेश होता. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा निराधार आहेत. प्रत्येक खेळाडूनं हा निर्णय मान्य केला आहे. 

रोहितच्या कामगिरीत घसरण 

2013 पासून मुंबईचे कर्णधारपद भूषवत रोहितनं मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवलं आहे. आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात रोहितचा फॉर्म खूपच खराब राहिला आहे. रोहितनं 2023 IPL मध्ये 16 सामन्यात 20.75 च्या सरासरीनं आणि 132.80 च्या स्ट्राईक रेटनं 332 धावा केल्या. 2022 मध्ये, त्यानं 14 सामन्यांमध्ये 19.14 च्या सरासरीनं आणि 120.18 च्या स्ट्राइक रेटनं 268 धावा केल्या. रोहितच्या फॉर्ममध्ये सरासरीच्या बाबतीत निश्चित घसरण झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rohit Sharma IPL 2024: कर्णधारपद गेल्यानंतर आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळणारच नाही?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget