एक्स्प्लोर

Insulin : मधुमेही रुग्णांना आता 100 टक्के स्वदेशी इन्सुलिन मिळणार, किंमतही स्वस्त

Swadeshi Insulin : भारतातील मधुमेही रुग्णांना स्वदेशी इन्सुलिन मिळणार आहे. भारतातील मधुमेही रुग्णांना स्वदेशी इन्सुलिन मिळणार आहे.

Made in India Insulin : भारतातील मधुमेही (Diabetes) रुग्णांना आनंदाची बातमी आहे. मधुमेहाच्या रुग्णांना आता देशी इन्सुलिन (Insulin) मिळणार आणि तीही स्वस्त दरात मिळणार असल्याने ही दिलासा देणारी बातमी आहे. टाइप वन आणि काही टाइप टू मधुमेहाच्या रुग्णांना दररोज इन्सुलिनची आवश्यकता असते. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे रुग्ण दिवसातून अनेक वेळा इन्सुलिन घेतात. आता त्यांना मेक इन इंडिया तंत्रज्ञानाने बनवलेले स्वदेशी इन्सुलिन मिळणार आहे.

भारतातील मधुमेहींसाठी आनंदाची बातमी

देशातील मधुमेही रुग्णांना आता 100 टक्के स्वदेशी इन्सुलिन मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे इतर ब्रँडच्या तुलनेत याची किंमतही कमी असणार आहे. अलीकडेच, USV ने Insuquik साठी Biogenomics सोबत भागीदारी केली आहे. हे भारतातील मधुमेह रूग्णांसाठी पहिले बायोसिमिलर इंसुलिन एस्पार्ट असणार आहे.

भारतात सुमारे 11 कोटी लोक मधुमेहग्रस्त

सध्या भारतात मधुमेहींची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. भारतात मधुमेह हा एक गंभीर आजार बनला आहे. सध्या देशातील प्रौढ लोकसंख्येपैकी 11.4 टक्के म्हणजे सुमारे 11 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. याशिवाय सुमारे 13 कोटी लोक प्री-डायबेटिस आहेत. त्यांची स्थिती फार कमी वेळात मधुमेहापर्यंत पोहोचू शकते. अशा कालात स्वस्त दरात इन्सुलिन उपलब्ध करण्याचा प्रयत्न USV आणि Biogenomics यांच्याकडून करण्यात येत आहे.

स्वस्तात इन्सुलिन उपलब्ध होणार

आता देशातील मधुमेहींना स्वदेशी Insuquik इन्सुलिन लवकरच उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Insuquik हे मेक इन इंडिया उत्पादन आहे. हे इन्सुलिन 100 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित आणि तयार करण्यात आलं आहे. या इन्सुलिनची जागतिक दर्जाची गुणवत्ता मजबूत क्लिनिकल प्रोग्रामद्वारे सुनिश्चित केली जाते. हे सर्व मेट्रो शहरे आणि टियर-II शहरांमध्ये देखील उपलब्ध होणार आहे.

मधुमेहाच्या रुग्णांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न

USV प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्हाला मधुमेहाच्या रुग्णांचे जीवन सुधारायचे आहे. ओरल अँटी-डायबिटीज सेगमेंटमध्ये आघाडीवर असल्याने, इंजेक्टेबल सेगमेंटमध्ये प्रवेश केल्याने डायबेटिस मार्केटमध्ये भारताचे स्थान आणखी मजबूत होईल.‘ मधुमेहाच्या रुग्णांना जागतिक दर्जाचे इंसुलिन देण्यासाठी आम्ही बायोजेनोमिक्सशी भागीदारी केली आहे, असंही तिवारी यांनी सांगितलं आहे.

'या' किंमतीला मिळणार इन्सुलिन

  • इन्सुक्विक कार्टिरिज (Insuquick Cartridge) : 700 रुपये
  • इन्सुक्विक वीडी पॅन (Insuquick VD Pan) : 915 रुपये
  • इन्सुक्विक वायल (Insuquik Vial) : 2321 रुपये

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget