एक्स्प्लोर

Munjya Box Office Collection Day 18 : बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरेना, 18 व्या दिवशी किती केली कमाई?

Munjya Box Office Collection Day 18 : कमी बजेटमध्ये आणि कोणत्याही मोठ्या कलाकाराशिवाय असलेल्या 'मुंज्या'ला तिसऱ्या आठवड्यातही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Munjya Box Office Collection Day 18 : आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित हॉरर-कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'ची (Munjya) बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या आठवड्यातही जादू कायम आहे. कमी बजेटमध्ये आणि कोणत्याही मोठ्या कलाकाराशिवाय असलेल्या 'मुंज्या'ला तिसऱ्या आठवड्यातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या सहाव्या दिवशीच 'मुंज्या'ने आपले बजेट वसूल केले होते. रिलीजच्या तिसऱ्या सोमवारी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

'मुंज्या'ने 18 व्या दिवशी किती कमाई केली?

चित्रपटगृहांमध्ये ‘मुंज्या’ ला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दररोज या चित्रपटाची कमाई होत आहे. ‘मुंज्या’ने त्याचे बजेट फार पूर्वीच वसूल केले होते, आता हा चित्रपट प्रचंड नफा कमावत आहे. बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ने आपली पकड मजबूत ठेवली असून कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'ला जोरदार टक्कर देत आहे. 'मुंज्या'ची क्रेझ कायम  असून तिसऱ्या वीकेंडलाही हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'मुंज्या'ने पहिल्या आठवड्यात 35.3 कोटी रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात 32.65 कोटींची कमाई केली. आता हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही जोरदार कमाई करत आहे. तिसऱ्या शुक्रवारी चित्रपटाने 3 कोटींची कमाई केली, तर तिसऱ्या शनिवारी 'मुंज्या'ने 5.5 कोटींचा व्यवसाय केला. तर तिसऱ्या रविवारी चित्रपटाचा व्यवसाय 6.85 कोटींच्या घरात होता. आता 'मुंज्या'च्या रिलीजच्या तिसऱ्या सोमवारच्या कमाईचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. 

सॅकनिल्कच्या  प्राथमिक अंदाजानुसार मुंज्याने 18 व्या दिवशी 2.10 कोटींची कमाई केली. 'मुंज्या'आता 18 दिवसांमध्ये साधारणपणे 85.40 कोटींच्या घरात कमाई केली. 

'मुंज्या'ला ब्रेक लावणार 'कल्कि 2898 एडी'?

बॉक्स ऑफिसवर ‘मुंज्या’ची चांगली कमाई होत आहे. चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या 18 दिवसांत 85 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.  मात्र, आता मुंज्याच्या कमाईवर ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट देखील या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या सायफाय चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोठी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट 'मुंज्या'च्या कमाईला ब्रेक लावू शकतो.

‘मुंज्या’ ने दिली मोठ्या चित्रपटांना मात...

 फक्त 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘मुंज्या’ ने अनेक मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे. या चित्रपटाने 350 कोटींचे बजेट असलेली  ‘बड़े मियां छोटे मिया’  आणि 200 कोटींचा बजेट असलेल्या अजय देवगणची भूमिका असलेल्या मैदान चित्रपटाला मात दिली आहे.  ‘बड़े मियां छोटे मिया’ ने बॉक्स ऑफिसवर 65 कोटींची कमाई केली. तर, 'मैदान'ने 52 कोटींची कमाई केली होती. 

 इतर संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Bike Rally : प्रचाराचा शेवटचा दिवस, आदित्य ठाकरेंची भव्य बाईक रॅलीPratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget