Morning Headlines 20th December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Lok Sabha Elections 2024 : देशभरात लोकसभेच्या 25 जागा लढवणार; रामदास आठवलेंची मोठी घोषणा
Lok Sabha Elections 2024 : नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीत इंडिया आघाडीच्या (India Alliance) बैठकीची धामधूम सुरू होती, जागावाटपावर चर्चा झाली तर दुसरीकडे भाजपप्रणित (BJP) रालोआ (NDA) चे घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्र सरकारमधील (Central Government) मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लोकसभेच्या देशभरात 25 जागा लढवणार असल्याची घोषणा केली. वाचा सविस्तर
WHO च्या 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' यादीत Covid-19 च्या नव्या सब-व्हेरियंटचा समावेश; JN.1 किती धोकादायक?
Coronavirus Updates: कोरोना व्हायरसनं (Coronavirus Updates) पुन्हा एकदा जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनाचा नवा सब-व्हेरियंट (New Sub-Variant of Corona) सध्या जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) म्हणजेच, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नं याबाबत एक निवेदन जारी केलं आहे आणि कोरोनाचा नवा सब-व्हेरियंट JN.1 हे 'व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्गीकरण केलं आहे. JN.1 पूर्वी त्याच्या मूळ वंशाच्या, BA.2.86 चा भाग म्हणून वर्गीकृत करण्यात आला होता. मात्र आता हिवाळा सुरू झाल्यानं हा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे, त्याचं स्वतंत्रपणे वर्गीकरण करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर
Weather Update : कुठे मुसळधार पाऊस तर, कुठे थंडीची लाट; आजचं हवामान कसं असेल?
Weather Update Today : देशात कुठे पाऊस (Rain) तर कुठे थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत आहे. तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तामिळनाडूमध्ये सोमवारी रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. तामिळनाडूमध्ये जोरदार पावसामुळे तिरुनेलवेली आणि थुथुकुडी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण पूरस्थितीमुळे भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कराला पाचारण करत बचावकार्य राबवलं जात आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण तामिळनाडूमधील 39 प्रदेशांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस झाला. 19 डिसेंबरला कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि तेनकासी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश बर्फाच्छादित असताना देशातील अनेक भागांमध्ये तापमानात घट झाली आहे. वाचा सविस्तर
Maharashtra Weather : राज्यात थंडीचा जोर वाढणार, ख्रिसमसवेळी मात्र तापमानाता वाढ; कसं असेल राज्यातील हवामान?
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस थंडी (Cold Weather) वाढणार असून हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, पुणे, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज आहे. ख्रिसमसदरम्यान महाराष्ट्रातील तापमान वाढण्याचा अंदाज आहे. आज आणि उद्या राज्यातील कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून त्यानंतर राज्यातील तापमान वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. वाचा सविस्तर
Donald Trump Disqualified From Presidency: डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा मोठा धक्का; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी ठरवलं अपात्र, नेमकं कारण काय?
Donald Trump Disqualified From Presidency: अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा झटका बसला आहे. कॅपिटल हिंसाचार प्रकरणी (Capitol Hill Violence Case) कोलोरॅडो राज्याच्या मुख्य न्यायालयाने ट्रम्प यांना अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केलंय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख दावेदार मानले जाणारे ट्रम्प यांना न्यायालयाने राष्ट्रपतीपदासाठी राज्याच्या प्राथमिक मतदानातून काढून टाकलं आहे. वाचा सविस्तर
Shreyas Talpade : श्रेयस तळपदेची प्रकृती आता कशी आहे? हृदयविकाराच्या झटक्यानंतर अभिनेत्याने स्वत:च दिली हेल्थ अपडेट
Shreyas Talpade Health Update : अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) 14 ऑक्टोबर 2023 रोजी हृदयविकाराचा झटका आला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. श्रेयसची अँजिओप्लास्टीही करण्यात आली आहे. अद्याप त्याला डिस्चार्ज मिळालेला नाही. त्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. आता हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयसने स्वत: हेल्थ अपडेट दिली आहे. वाचा सविस्तर
Ind Vs SA 2nd ODI Score: 6 षटकार, 9 चौकार... टॉनी डीजोरजीच्या तुफानी शतकानं टीम इंडियाकडून विजय हिसकावला
Team India Vs South Africa 2nd ODI Score: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला (Team India) 8 विकेट्सनी दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. हा सामना मंगळवारी (19 डिसेंबर) सेंट जॉर्ज पार्क, गाकबेर्हा येथे खेळवण्यात आला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं (India National Cricket Team) 8 गडी राखून विजय मिळवला होता. वाचा सविस्तर
20 December In History: राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी, आजच्याच दिवशी मतदानाचे वय 18 वर्षे करण्यात आले
स्वच्छतेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज (Gadge Maharaj) मानवतेचे खरे परोपकारी, सामाजिक समरसतेचं मूर्त स्वरूप म्हणजे गाडगे महाराज. गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. अडोल्फ हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका झाली होती. मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते. आजच्या दिवशी इतिहासात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या हे सविस्तर जाणून घेऊयात. वाचा सविस्तर
Horoscope Today 20 December 2023 : आजचा बुधवार खास! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य
Horoscope Today 20 December 2023 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 20 डिसेंबर 2023, बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीचे लोक आज धार्मिक प्रवासाला जाऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. आज कन्या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. आज तुम्हाला तुमच्या आत नवीन ऊर्जा जाणवेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. वाचा सविस्तर