Shreyas Talpade : श्रेयस तळपदेची प्रकृती आता कशी आहे? हृदयविकाराच्या झटक्यानंतर अभिनेत्याने स्वत:च दिली हेल्थ अपडेट
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
![Shreyas Talpade : श्रेयस तळपदेची प्रकृती आता कशी आहे? हृदयविकाराच्या झटक्यानंतर अभिनेत्याने स्वत:च दिली हेल्थ अपडेट Shreyas Talpade Health Update After Five days of heart attack Actor said I am a little better now Actor First Reaction On heart attack And Health Know bollywood Marathi Actor Entertainment Latest Update Shreyas Talpade : श्रेयस तळपदेची प्रकृती आता कशी आहे? हृदयविकाराच्या झटक्यानंतर अभिनेत्याने स्वत:च दिली हेल्थ अपडेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/20/c448bc741dd600569b5dd99ff92c6c0c1703037893932254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shreyas Talpade Health Update : अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) 14 ऑक्टोबर 2023 रोजी हृदयविकाराचा झटका आला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. श्रेयसची अँजिओप्लास्टीही करण्यात आली आहे. अद्याप त्याला डिस्चार्ज मिळालेला नाही. त्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. आता हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयसने स्वत: हेल्थ अपडेट दिली आहे.
तुमचा पाठिंबा आणि प्रार्थनेसाठी खूप आभार : श्रेयस तळपदे
श्रेयस तळपदेने 'जूम'ला दिलेल्या मुलाखतीत चाहत्यांनी चिंता व्यक्त केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. अभिनेता म्हणाला,"तुमचा पाठिंबा आणि प्रार्थनेसाठी खूप-खूप आभार. आता माझी प्रकृती पूर्वीपेक्षा ठिक आहे. अद्याप रुग्णालयातच माझ्यावर उपचार सुरू आहेत".
श्रेयस तळपदेला सध्या 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Joungle) या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमाच्या शूटिंगनंतर तो घरी गेला. अॅक्शन सीन्स शूट केल्यामुळे अस्वस्थ वाटत असल्याचं अभिनेत्याने त्याच्या पत्नीला सांगितलं. त्यानंतर श्रेयसची पत्नी दिप्ती त्याला घेऊन रुग्णालयात घेऊन गेली. रुग्णालयात जात असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांसह मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता.
श्रेयस तळपदेवर मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलव्यू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वयाच्या 47 व्या वर्षी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला आहे. श्रेयसच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे.
श्रेयसच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या.. (Shreyas Talpade Upcoming Project)
अभिनेता श्रेयस तळपदेने मराठीसह हिंदी सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. अभिनेता लवकरच कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'इमरजेन्सी' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाचाही तो भाग आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रेयस आणि अक्षयसह रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लिव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. श्रेयस आज एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतो. त्याच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या
Shreyas Talpade : एकेकाळी होती पोट भरण्याची चिंता; पण आज एका सिनेमासाठी श्रेयस घेतोय एवढे पैसे; कसं बदललं आयुष्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)