(Source: Poll of Polls)
Lok Sabha Elections 2024 : देशभरात लोकसभेच्या 25 जागा लढवणार; रामदास आठवलेंची मोठी घोषणा
Ramdas Athawale: आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) रिपब्लिकन पक्षाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला पाठींबा देणार आहे.
Lok Sabha Elections 2024 : नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीत इंडिया आघाडीच्या (India Alliance) बैठकीची धामधूम सुरू होती, जागावाटपावर चर्चा झाली तर दुसरीकडे भाजपप्रणित (BJP) रालोआ (NDA) चे घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्र सरकारमधील (Central Government) मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लोकसभेच्या देशभरात 25 जागा लढवणार असल्याची घोषणा केली.
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) रिपब्लिकन पक्षाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला पाठींबा देणार आहे, हे रामदास आठवलेंनी स्पष्ट केले आहे. एन.डी.ए.चा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहे. देशभरात रिपब्लिकन पक्षाचे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशात संघटन वाढत आहे, असं रामदास आठवले म्हणाले. त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात रिपब्लिकन पक्ष लोकसभेच्या 25 जागा लढवणार असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
नवी दिल्लीतील कॉन्स्टीटयुशन क्लब येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना रामदास आठवले यांनी ही माहिती दिली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) देशभरातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील कार्यकारणीच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा आज झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत रामदास आठवले यांनी घेतला. आगामी मार्च 2024 पर्यंत सर्व राज्यांच्या कार्यकारणींचा अहवाल आणि किमान 5 लाख क्रियाशील सदस्य बनविण्याचं उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश रामदास आठवले यांनी आज कार्यकर्त्यांना दिले आहेत.
अनेक राज्यात स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर तसेच दलित, आदिवासी महिला यांच्या प्रश्नांबाबत वेळोवेळी घडणाऱ्या घडामोडींवर आणि घटनांवर विविध प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपआपल्या पातळीवर आंदोलन करण्याच्या सुचना रामदास आठवले यांनी दिल्या.
अनेक राज्यात लोकसभा निवडणूक लढण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. अनेक राज्यांमध्ये चांगलं तुल्यबळ उमेदवार रिपब्लिकन पक्षाकडे असून आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात किमान 25 जागा लढण्याची रिपब्लिकन पक्षाची तयारी आहे, असं आठवले म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष नक्कीच लोकसभेत खातं उघडणार असा निर्धार यावेळी रामदास आठवले यांनी व्यक्त केला.