एक्स्प्लोर

Morning Headlines 18th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

Weather Update : पुढील 48 तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाची शक्यता, IMD ने वर्तवला अंदाज

Weather Update Today : एकीकडे देशातील काही भागात थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काही भागात पावसानं हजेरी लावली आगे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, पुढील 48 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशात काही भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर...

Aacharya Vidhya Sagar Maharaj : जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराजांचं निधन, जैन धर्मियांवर दु:खाचा डोंगर

Aacharya Vidhya Sagar Maharaj Passes Away : जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झालं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच निधन झालं. ते 77 वर्षाचे होते. आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 कर्नाटकमध्ये झाला. वाचा सविस्तर...

Jammu Kashmir : PM मोदी 20 फेब्रुवारीला जम्मू दौऱ्यावर, दौऱ्यापूर्वी जम्मूत सुरक्षा वाढवली, ड्रोन उडवण्यावर बंदी, कलम 144 अंतर्गत आदेश जारी

PM modi Jammu Kashmir Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारीला जम्मू (Jammu Kashmir) दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी शनिवारी, अधिकाऱ्यांनी फ्लाइंग ड्रोन, पॅराग्लायडर आणि रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्टवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. वाचा सविस्तर...

Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा स्थगित, प्रवास अर्ध्यावर सोडून राहुल गांधी वायनाडला रवाना; समोर आलं कारण

Bharat Jodo Nyaya Yatra : काँग्रेसची (Congress) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) जात आहे. मात्र, शनिवारी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा अर्धवट सोडून अचानक वायनाडला रवाना झाले. शनिवारी राहुल गांधी यांचा यात्रेचा मार्ग वाराणसी ते उत्तर प्रदेशातील भदोही असा होता. पण, राहुल गांधी अचानक वायनाडला गेले असून, त्यांनी प्रवास अर्ध्यावरच थांबवला आहे. राहुल गांधी यात्रेमधूनच अचानक निघून गेले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधी वायनाडला जाणार असल्याची माहिती दिली आहे. वाचा सविस्तर...

रायगडची जागा आपलीच, कामाला लागा, अजित पवारांनी सुनील तटकरेंच्या प्रचाराचा फोडला नारळ! 

Raigad Lok Sabha constituency Election 2024 : रायगडच्या लोकसभेच्या जागेवरून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपमध्ये (BJP) सुरू असलेल्या वादाला आता पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे. रायगडची जागा (Raigad Lok Sabha) राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी स्पष्ट केलं.  म्हसळा यथील सभेत अजित पवार यांनी रायगड लोकसभा मतदारसंघ सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांचाच असल्याचं सांगितलं. त्याशिवाय कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देशही दिले. शनिवारी अजित पवार यांनी एकप्रकारे सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा नारळच फोडला. वाचा सविस्तर...

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला खिंडार, कमलनाथ 'कमळ' हातात घेण्याची शक्यता

Kamal Nath Joined BJP: काँग्रेसला (Congress) रामराम ठोकणाऱ्या नेत्यांची यादी मोठी होत चालली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातून अशोक चव्हाण (Ashok Chavan join Bjp) यांनी काँग्रेसला (BJP) रामराम ठोकून कमळ हातात घेतलं. आता मध्य प्रदेशमधूनही अशीच चर्चा सुरु झाली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath)  काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. कमलनाथ हे त्यांचे पुत्र खासदार नकुलनाथ यांच्यासह अनेक आमदारांना सोबत घेत भाजपमध्ये (BJP)  प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. वाचा सविस्तर...

Farmers Protest : दिल्लीकडे कूच की घरी परतणार? केंद्र आणि शेतकरी संघटनांची आज महत्त्वाची बैठक, नेमकं कुठे अडलं? जाणून घ्या

Farmers Protest : शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बैठकांच्या तीन फेऱ्या झाल्या. मात्र, या बैठकांमध्ये एकमत होऊ शकले नाही. यानंतर आज पुन्हा एकदा शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये चर्चेची चौथी फेरी होणार आहे. अशा स्थितीत या बैठकीत तोडगा निघेल, अशी आशा आहे. वाचा सविस्तर...

18 February In History : स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस, लोकहितवादी आणि क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्मदिन; आज इतिहासात

Today In History : 18 फेब्रुवारी हा दिवस भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. त्यामध्ये समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांचा जन्म आजच्याच दिवसाचा. तसेच स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस आणि क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा यांचाही जन्म दिवस आहे. वाचा सविस्तर...

Horoscope Today 18 February 2024 : आजचा रविवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 18 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच, 18 फेब्रुवारी 2024, रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या लोकांना आज घरात कामाचा अधिक भार जाणवेल. कन्या राशीचं वैवाहिक जीवन आज चांगलं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget