एक्स्प्लोर

रायगडची जागा आपलीच, कामाला लागा, अजित पवारांनी सुनील तटकरेंच्या प्रचाराचा फोडला नारळ! 

Raigad Lok Sabha constituency Election 2024 : महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागांचे वाटप झालेले नाही, मात्र रायगडच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरु होती. शनिवारी अजित पवार यांनी ही जागा आपलीच असल्याचं सांगत प्रचाराला सुरुवात केली.

Raigad Lok Sabha constituency Election 2024 : रायगडच्या लोकसभेच्या जागेवरून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपमध्ये (BJP) सुरू असलेल्या वादाला आता पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे. रायगडची जागा (Raigad Lok Sabha) राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी स्पष्ट केलं.  म्हसळा यथील सभेत अजित पवार यांनी रायगड लोकसभा मतदारसंघ सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांचाच असल्याचं सांगितलं. त्याशिवाय कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देशही दिले. शनिवारी अजित पवार यांनी एकप्रकारे सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा नारळच फोडला. 

महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागांचे वाटप झालेले नाही, मात्र रायगडच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरु होती. शनिवारी अजित पवार यांनी ही जागा आपलीच असल्याचं सांगत प्रचाराला सुरुवात केली.

रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरेच आहेत, कामाला लागा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत रायगड लोकसभेच्या वादावर पूर्णविराम दिला. भाजपकडून इच्छुक उमेदवार धर्यशील पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अजित पवार यांच्याकडून भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समजूत घालल्याचं समोर आलेय. त्याशिवाय यावेळी अजित पवारांनी मराठा आरक्षणावर महत्वाचे निर्णय घेण्यासाठी 20 फेब्रुवारीला  स्पेशल अधिवेशन भरवणार असल्याचेही सांगितलं. 

भाजप-राष्ट्रवादीचा वाद मिटला ?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी म्हसळा येथील शहरी भागासाठी मंजूर करण्यात आलेली 43 कोटी रुपयांची पाणी पुरवठा प्रकल्प योजनेचा भूमिपूजन अजित पवारांनी केलं. यावेळी रायगड लोकसभेवर भाजपकडून होत असलेला दावा मोडत त्यांनी मोडला. या लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुनील तटकरेच ही जागा लढवतील असा दावा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरू असलेला शाब्दिक वाद आता संपण्याची शक्यता असून या वादाला आता पूर्ण विराम मिळाला आहे.

20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन -

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यानी राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर योग्य भाष्य करत या आरक्षणाकरिता मंत्री मंडळाकडून येत्या 20 फेब्रुवारीला स्पेशल अधिवेशन भरवणार असल्याची माहिती दिली. याप्रसंगी मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.

रायगड मतदारसंघाची रचना आणि पक्षीय बलाबल…

रायगड लोकसभा मतदारसंघाची 2008 मध्ये पुनर्रचना करण्यात आली. यात रायगड जिल्ह्यातील 4 तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला. यात रायगडमधील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, तर रत्नागिरीतील गुहागर दापोली या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. सहापैकी अलिबाग महाड आणि दापोली हे तीन विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. तर पेण मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. गुहागरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget