Aacharya Vidhya Sagar Maharaj Passes Away : जैन मुनी संत आचार्य विद्यासागर महाराजांचं निधन, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; जैन धर्मियांवर दु:खाचा डोंगर
Aacharya Vidhya Sagar Maharaj Passes Away : जैन धर्मियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं निधन झालं आहे.
Aacharya Vidhya Sagar Maharaj Passes Away : जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झालं आहे. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच निधन झालं. ते 77 वर्षाचे होते. आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 कर्नाटकमध्ये झाला.
संत आचार्य विद्यासागर महाराजांनी घेतली समाधी
दिगंबर जैन आचार्य (दार्शनिक साधू) होते. शिष्यवृत्ती आणि तपस्यांसाठी त्यांची ओळख होती. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली, पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केलं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच्यावर आज दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
आज पंचतत्वात होणार लीन
जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेत देह त्याग केला आहे. मध्यरात्री 2.30 वाजता आचार्य विद्यासागर महाराज यांची अखेरचा श्वास घेतला. चंद्रगिरीच्या डोंगरगड येथे त्यांचं निधन झालं आहे. आचार्य विद्यासागर महाराज गेल्या तीन दिवसांपासून अन्न-जल त्याग केला होता. त्यानंतर ते ब्रम्हलीन झाले. आज ते पंचतत्वात विलीन करण्यात येईल.
पंतप्रधान मोदींनी घेतलं होतं दर्शन
दिगंबर मुनी परंपरेचे आचार्य विद्यासागर जी महाराज यांनी शनिवारी रात्री 2.35 वाजता छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे देह सोडला. मिळालेल्या माहितीनुसार, ते गेल्या सहा महिन्यांपासून डोंगरगढ येथील चंद्रगिरी येथे राहत होते आणि गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते, त्यानंतर त्यांनी दुपारी 2:35 वाजता अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी एक वाजता त्यांचे पार्थिव पंचतत्वात विलीन होणार आहे. छत्तीसगड दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डोंगरगड गाठले आणि जैन साधू विद्यासागर महाराज यांचे दर्शन घेतलं होतं.
आचार्य विद्यासागर महाराजांचा जीवनप्रवास
आचार्य विद्यासागर महाराज याचं मूळ नाव विद्याधर. दीक्षेनंतर त्यांचं विद्यासागर मुनी असं नामकरण झालं. कर्नाटकच्या बेळगावमधील चीकोडच्या सदलागा या गावामध्ये विद्यासागर याचं नववीपर्यंत शिक्षण झालं. आचार्यविद्यासागर मुनींनी 1966 मध्ये जैन मुनी आचार्य देशभूषण महाराज यांच्याकडून ब्रह्मचर्य व्रत घेतलं होतं. 30 जून 1968 मध्ये आचार्य ज्ञानसागर महाराज यांनी वयाच्या 20 वर्षी मुनी दीक्षा दिली. 22 नोव्हेंबर 1972 रोजी वयाच्या अवघ्या 26 वर्षी त्यांना आचार्य पद देण्यात आलं.
जैन धर्मियांचे आचार्य विद्यासागर महाराज यांनी मुलींच्या शिक्षणासाठी संस्था आश्रम उभ्या केल्या. देशभरात हजारो गो शाळा स्थापन केल्या. विद्यासागर यांना आठ भाषा अवगत होत्या. त्यांनी मुख्य ग्रंथ मूकमाटी महाकाव्य ग्रंथ लिखाण केलं. हा संस्कृतमधील लिखाणांनंतर 8 भाषेत अनुवादित करण्यात आला. विद्यासागर महाराज यांनी देशभरात पद यात्रा काढून समाजाचा प्रसार, प्रचार करत त्यांनी हजारो मुनींना दीक्षा दिली. यामध्ये तरुण उच्चशिक्षित देशविदेशातील तरुणांना मार्गदर्शन केलं. जैन धर्मियांच्या दिगंबर पंथीयामध्ये सर्वोच आचार्य पद मिळालं. विद्यासागर महाराज यांनी भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी वेळोवेळी आवाहन केले. तर, मातृभाषा जोपासण्यासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला.
इंग्रजी भाषा ही नुसती ज्ञान म्हणून वापरा राष्ट्रभाषेला प्राधान्य दिलं पाहिजे. 'मूळ अक्षरात अ से अज्ञानि आणि ज्ञसे ज्ञानी बनता ही अ इंग्रजी मध्ये a से अप्पल आणि z से झेब्रा होतो, असं ते नेहमी सांगत असत. आतापर्यत अस्तित्वात आलेल्या प्रतेक सरकारला त्यांनी राष्ट्रहित, एकता याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केलं. देशभरातील अनेक राजकीय व्यक्ती आचार्य विद्यासागर महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या भेटी घ्यायचे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सुमित्रा महाजन, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल रमेश बैस यांनी ही विद्यासागर महाराज यांना भेटून आशिर्वाद घेतले होते.