एक्स्प्लोर

Horoscope Today 18 February 2024 : आजचा रविवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 18 February 2024 : 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 18 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच, 18 फेब्रुवारी 2024, रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या लोकांना आज घरात कामाचा अधिक भार जाणवेल. कन्या राशीचं वैवाहिक जीवन आज चांगलं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

मेष (Aries Horoscope Mesh Rashi Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस साधारण राहील. आज तुम्हाला घरात कामाचा अधिक भार जाणवेल आणि यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. व्यवसायिकांना आज व्यवसायात जास्त फायदा होईल. व्यावसायिकांनी ग्राहकांशी चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे, तरच तुमचा व्यवसाय पुढेही चांगला चालेल. आज तुमच्या कुटुंबात काही वाद उद्भवू शकतात, आज तुम्ही कौटुंबिक स्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु थोडा डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो.

वृषभ (Taurus Horoscope Vrushabh Rashi Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला राहील. रविवारच्या सुट्टीमुळे तुमचा आजचा दिवस निवांत जाईल. व्यावसायिकांचा आजचा दिवस नफ्याचा असेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन योजना आखताना बिझनेस पार्टनरचा सल्ला घ्यावा. आज तुम्ही कुटुंबासोबत तुमची आवडती वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जाऊ शकतात, परंतु तिथे तुमचा खर्च वाढू शकतो. आज तुम्ही आरोग्याची विशेष काळजी घ्या. सकाळी नियमित व्यायाम करण्याची सवय लावा.

मिथुन (Gemini Horoscope Mitun Rashi Today)

मिथुन राशीच्या नोकरदारांना आज व्यवसायात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज ज्यांचं ऑफिस असेल त्यांना त्यांचे वरिष्ठ तुम्हाला काही अवघड काम देऊ शकतात, जे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अफाट मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर व्यावसायिक भागीादाराशी योग्य समन्वय साधा, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. मिथुन राशीचे तरुण आज मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात, परंतु आधी पालकांची संमती घेतली पाहिजे आणि मगच फिरायला गेलं पाहिजे.

कर्क (Cancer Horoscope Kark Rashi Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस तणावाचा असेल. आज ऑफिसमध्ये तुमच्यावर कामाचा अधिक भार असेल, पण तरीही तुम्ही सर्व कामं योग्य रितीने हाताळाल. व्यावसायिक आज कठीण परिस्थितीतून स्वत:ला बाहेर काढतील. व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्वपदावर येईल आणि तुम्ही चांगला नफा कमवायला लागाल. आज तुमची कौटुंबिक स्थिती चांगली असेल. उत्तम आरोग्यासाठी तु्म्ही तुमच्या दिनचर्येत योगासनांचा समावेश केला पाहिजे. आज तुम्हा कुटुंबासोबत अधिक वेळ घालवाल.

सिंह (Leo Horoscope Singh Rashi Today)

सिंह राशीच्या लोकांचा आजचा रविवार निवांत राहील. आज तुम्ही कुटुंबासोबत निवांत वेळ घालवाल. व्यावसायिकांनी आज गुंतवणुकीचा विचार करू नये, अन्यथा आज तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. जर तुमच्या कुटुंबात बऱ्याच काळापासून वाद सुरू असेल तर आज सर्व वाद मिटतील, यामुळे तुम्हाला मानसिक शांति मिळेल.आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु तुम्हाला अंगदुखी जाणवेल. आज तुमच्या घरी काही खास पाहुणे येऊ शकतात.

कन्या (Virgo Horoscope Kanya Today)

कन्या राशीचा आजचा दिवस चांगला असेल. नोकरीत आज तुम्हाला सहकाऱ्यांची मदत मिळेल, कामाच्या ठिकाणीही तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. व्यावसायिकांनी आज व्यवसायात अधिक लक्ष दिलं पाहिजे, तुमचं प्रोडक्ट अधिकाधिक लोकांकडे पोहोचेल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही घरातल्यांना मदत करण्यास जात असाल तर आधी त्यांच्याशी बोलून घ्यावं. कन्या राशीचं वैवाहिक जीवन आज चांगलं असेल. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, सकाळी उठताच तुम्ही फळांचं सेवन केलं पाहिजे. जंक फूडचं सेवन तुम्ही टाळलं पाहिजे. आज तुम्ही घरातील अन्नाला प्राधान्य द्या. 

तूळ (Libra Horoscope Tula Rashi Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस साधारण असेल. आज तुम्ही कामाचा जास्त ताण घेऊ नये, अन्यथा तुमचं आरोग्य बिघडू शकतं. आज सुट्टीच्या दिवशीही तुम्हाला ऑफिसच्या कामासंबंधित फोन येऊ शकतात. भागीदारीत व्यवसाय करणारे आज बिझनेस पार्टनरवर शंका घेऊ शकतात. आज तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आज तुम्ही जोडीदारासोबत डिनरला जाऊ शकतात. तुम्हाला करिअरमध्ये तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. उत्तम आरोग्यासाठी तुम्ही योगासनांचा अवलंब करावा.

वृश्चिक (Scorpio Horoscope Vruschik Rashi Today)

वृश्चिक राशीचा आजचा दिवस चांगला असेल. नोकरीत आज तुम्हाला सहकाऱ्यांची मदत मिळेल, कामाच्या ठिकाणीही तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. व्यावसायिकांनी आज व्यवसायात अधिक लक्ष दिलं पाहिजे, तुमचं प्रोडक्ट अधिकाधिक लोकांकडे पोहोचेल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही घरातल्यांना मदत करण्यास जात असाल तर आधी त्यांच्याशी बोलून घ्यावं. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला आरामाची घरी भासेल. आठवडाभराचा थकवा दूर करण्यासाठी आज आरामाला प्राधान्य द्या.

धनु (Sagittarius Horoscope Dhanu Rashi Today)

धनु राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असेल, परंतु नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी चतुर लोकांपासून दूर राहावं, अन्यथा तुमची प्रगती होऊ शकणार नाही आणि तुमची प्रतिमा देखील खराब होईल. व्यावसायिकांना आज पैशांची गरज भासू शकते, अशा वेळी तुम्ही कुटुंबियांची मदत घेऊ शकतात. तरुणांनी आज सर्व निर्णय विचारपूर्वक घ्यावे. जे घरापासून दूर, पालकांपासून दूर राहतात त्यांनी फोनवरुन कुटुंबियांशी संपर्क साधावा. घरातील व्यक्तींच्या आरोग्याविषयी चौकशी करावी. आज घरातील लहान मुलांची काळजी घ्या, त्यांना खेळताना दुखापत होऊ शकते.

मकर (Capricorn Horoscope Makar Rashi Today)

मकर राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. तुम्ही आज तुमच्या मित्रांना भेटाल. व्यावसायिकांनी आज व्यवसायात सावधगिरी बाळगली पाहिजे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना आज समस्या जाणवतील. आज तुम्हाला किचनमध्ये काम करताना सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा चाकूमुळे किंवा धारदार शस्त्रामुळे दुखापत होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला पोटदुखीचा त्रास देखील जाणवू शकतो.

कुंभ (Aquarius Horoscope Kumbha Rashi Today)

कुंभ राशीच्या लोकांनी आजच्या दिवसात सावध राहावं. आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील कोणत्याही प्रकारच्या भांडणापासून दूर राहा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल, आज तुम्ही नफ्यात असाल. आज तुम्ही तुमच्या सासरच्या मंडळींसोबत एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, जिथे तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना भेटाल, त्यांच्यासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, फक्त थोडीशी डोकेदुखी तुम्हाला त्रास देऊ शकते. 

मीन (Pisces Horoscope Meen Rashi Today)

मीन राशीचा आजचा दिवस चांगला असेल. आज तुम्ही जोडीदारासोबत जास्त वेळ घालवाल, तुम्ही कुटुंबासोबत फिरायला देखील जाऊ शकता. व्यावसायिकांनी आज व्यवसायात बारीक लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. आज वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो आणि तुम्हाला दुखापत होऊ शकते. आजच्या दिवसात तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या आरोग्याची देखील विशेष काळजी घ्यावी लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Budh Uday 2024 : मार्चमध्ये होणार बुध ग्रहाचा उदय; 'या' राशी कमावणार बक्कळ पैसा, नोकरी-व्यवसायात मिळणार यश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget