एक्स्प्लोर

Morning Headlines 17th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

Farmer Protest : आंदोलक शेतकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक, सुरक्षा जवानांना चिथावणी देण्याचाही प्रयत्न? पोलिसांचा दावा, व्हिडीओ केला शेअर
 
Farmer Protest : पंजाबमधील (Punjab) शेतकऱ्यांनी मंगळवारी (13 फेब्रुवारी) राजधानी दिल्लीकडे (Delhi) मोर्चा सुरू केला होता, परंतु कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे या शेतकऱ्यांना शंभू आणि खनौरी सीमेवरच थांबविण्यात आले. ज्यानंतर शेतकरी केंद्र सरकारकडे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणीच तंबू ठोकून बसले आहेत. हरियाणा पोलिसांकडून 'दिल्ली मार्च'साठी आलेल्या शेतकऱ्यांना सीमेवरच रोखले असून या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तर आंदोलक शेतकरी पोलिसांचा बंदोबस्त तोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून, त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, हरियाणा पोलिसांनी शुक्रवारी सोशल मीडिया 'X' वर शेतकरी आंदोलन संदर्भातील विविध व्हिडिओ शेअर केले, ज्यांचे वर्णन प्रक्षोभक म्हणून करण्यात आले आहे. वाचा सविस्तर 

RBI चा 2 कोटी लोकांना दिलासा, पेटीएम बँकेत डिपॉझिटची अंतिम मुदत वाढवली 

Paytm Payments Bank Crisis: रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी बहुप्रतिक्षित FAQ जारी केले. FAQ मध्ये, रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या विविध सेवांबाबत लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंकाचं निरसण करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच पेटीएम फास्टॅग वापरणाऱ्या करोडो लोकांना दिलासा दिला आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेत (Paytm Payments Bank) पैसे जमा करण्याची किंवा फास्टॅग रिचार्ज करण्याची अंतिम मुदत आता 29 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळं  2 कोटी लोकांना दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर 

कुणबी नोंदीवाल्यांना नवं आरक्षण नाही, हे सांगणं चुकीचं - मनोज जरांगे

कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी आरक्षण (kunbi caste certificate) आणि कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना नवं आरक्षण (maratha reservation) असं सांगणं चुकीचं आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करावीच लागेल, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते अंतरवाली सराटीतून (Antarwali Sarathi) बोलत होते. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालवली होती, त्यामुळे राज्य सरकारने कोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाच्या निर्देशानंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेतलाय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण 20 तारखेला निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.वाचा सविस्तर

 चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट-भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल, 300 ते 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल 

चिपळूणमध्ये माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या गाडीवर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यालयासमोर काल दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळूणात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं, राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना काल भिडले होते. चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूचे मिळून जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा चिपळूण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

डोळ्यात डोळे घालून मतदारसंघात 'जय श्रीराम' म्हणणार का? अशोक चव्हाणांकडून सुटसुटीत उत्तर! 

Ashok Chavan : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आदर्श प्रकरणात ज्या भाजपने हैराण करून आरोपांची राळ उडवून दिली त्याच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काही तासांमध्येच राज्यसभेची खासदारकी सुद्धा पदरात पाडून घेतली. भाजपमध्ये पदासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले असतानाच त्यांनी थाटात प्रवेश करून टाकला. तेच अशोक चव्हाण एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर होते. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी कोणतीही थेट टीका केली नाही. किंवा भाजप प्रवेश कसा घडून आला? हे सुद्धा त्यांनी थेटपणे सांगण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक प्रश्नांना ते सावधपणे सामोरे जाताना दिसून आले. वाचा सविस्तर 

IND vs ENG: भारताला मोठा धक्का, कौटुंबिक कारणामुळे तिसऱ्या कसोटीतून अश्विनची माघार 

भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट (Rajkot) येथे सुरु असलेला तिसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. दुसऱ्या दिवशी अश्विनने (R Ashiwin) इंग्लंडची सलामी जोडी फोडत कसोटी करिअरमधील 500 विकेट घेण्याचा भीमपराक्रम केला. पण काही तासानंतर अश्विनने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. वाचा सविस्तर 

 अग्रवालांची लेक होणार पाडगांवकरांची सून, 5 स्टार हॉटेलमध्ये नाही तर घरीच पार पडणार अभिनेत्री दिव्या अग्रवालचा लग्नसोहळा 

 सध्या बॉलीवूडसह सिनेसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री हे लग्नबंधनात अडकत असून त्यांच्या आलिशान लग्नसोहळे देखील चाहत्यांचा पसंतीस पडत आहेत. नुकतच अभिनेत्री दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) हीने तिच्या लग्नाची घोषणा केली असून ती तिच्या बॉयफ्रेंडसह लग्नबंधनात अडकणार आहे. अपूर्व पाडगांवकरसोबत दिव्या तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.  वाचा सविस्तर

आजचा शनिवार खास! शनिच्या कृपेने 'या' राशींची अडकलेली कामं होणार पूर्ण; 12 राशींचे आजचे भविष्य जाणून घ्या  

 राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 17 फेब्रुवारी 2024, शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोकांना आज आपल्या व्यवसायाकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. कन्या राशीच्या लोकांवर आज कामाचा ताण खूप वाढू शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या..वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Embed widget