एक्स्प्लोर

Morning Headlines 14th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

67 दिवस, 15 राज्यांमधील 110 लोकसभा मतदारसंघांतून प्रवास; आजपासून राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला सुरुवात

Bharat Jodo Nyay Yatra: नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) रविवारी (14 जानेवारी) 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyaya Yatra) सुरू करणार आहेत. हा प्रवास मणिपूरच्या (Manipur) थौबल जिल्ह्यातून (Thoubal District) सुरू होऊन मुंबईला (Mumbai News) पोहोचेल. या काळात राहुल गांधी 6 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत. हा प्रवास तब्बल दोन महिने चालणार आहे... वाचा सविस्तर 

मोठी बातमी! मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, आजच शिंदे गटात प्रवेशाची शक्यता

Congress Leader Milind Deora: मुंबई : काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) शिंदे गटात (Shinde Group) जाणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) जोर धरला आहे. अशातच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस (Congress) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. देवरा यांच्या पक्षपदाच्या राजीनाम्यामुळे आजच ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे... वाचा सविस्तर

वयाच्या 27व्या वर्षी खासदारकी, काँग्रेसचा सुसंस्कृत, सुशिक्षित चेहरा; दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आग्रही असणारे मिलिंद देवरा कोण?

Who Is Milind Deora: मुंबई : यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असणार आहे. अशातच याच नव्या वर्षात लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) धक्का बसण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरलंय दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ (Mumbai South Lok Sabha Constituency). शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस (Congress) यांच्या दक्षिण मुंबई मतदारसंघावरुन धुसफूस सुरू आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबई मतदारसंघावर वारंवार दावा सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या या दाव्यांमुळे काँग्रेसचा एका बडा नेता मात्र नाराज झाल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेसमधील दक्षिण मुंबईतील एक बडा चेहरा, माजी मंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते मिलिंद देवरा (Milind Deora) शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला शह देण्यासाठी शिंदेंनी नवी रणनीती आखल्याचं बोललं जात आहे... वाचा सविस्तर 

Weather Today : गारठा वाढणार! सर्वत्र दाट धुक्याची चादर, 'या' भागात पावसाची शक्यता

Weather Update Today : देशाच्या विविध भागातील तापमानाचा पारा आता घसरताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात देशभरात विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आता देशातील हवामानात बदल होत असून गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह जम्मू-काश्मीरमध्येही प्रचंड थंडी पाहायला मिळत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील 4 ते 5 दिवसांत उत्तर भारतात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात थंडीच्या तीव्र लाटेची शक्यता असून त्यानंतर थंडीच घट होण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण पंजाब तसेच बिहारमध्ये काही ठिकाणी थंडीच्या दिवसापासून तीव्र थंडी पाहायला मिळत आहे... वाचा सविस्तर  

Gold Rate Today : सोनं-चांदी महागली! खरेदीआधी आजचे दर जाणून घ्या

Gold Silver Rate Today, 14 January 2024 : आज देशात सोन्याच्या किमतीत वाढ (Gold Rate Today) झाली आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही (Silver Rate Today) वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, 14 जानेवारील आज सोन्याची किंमत किंचित घसरली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर (22K Gold Price Today) 5800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर (24K Gold Price Today) 6327 रुपये प्रति ग्रॅम आहे. दिल्लीत 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर (24K Pure Gold rate) 63,270 रुपये आहे. मुंबईत सोन्याचा दर 63,270 रुपये (Gold Price Today) आहे. चेन्नईत सोन्याचा दर 58,450 रुपये आहे.  यासोबतच, चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत असून, आज चांदीची किंमत 76,500 रुपये प्रति किलोग्रॅमवर (Silver Price Today) पोहोचली आहे... वाचा सविस्तर 

Shankaracharya and Ram Mandir : शंकराचार्य कोण असतात? त्यांचे हिंदू धर्मातील महत्व किती, निवड कशी होते? सध्या शंकराचार्य कोण आहेत? जाणून घ्या...

Shankaracharya and Ram Mandir : अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन 22 जानेवारीला होत आहे. मंदिराच्या उद्घाटनासाठी देश तर सज्ज झालाच आहे. देशभरात राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण आहे. सेलिब्रिटी, राजकारण्यांपासून साधू-संतांना यासाठी निमंत्रण पाठवण्यात येत आहेत. या दरम्यान शंकराचार्यांचे (Shankaracharya) नाव चर्चेत आले आहे... वाचा सविस्तर 

Horoscope Today 14 January 2024 : आजचा रविवार खास! 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 14 जानेवारी 2024 रोजी रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या व्यावसायिकांना आज आपल्या स्वभावात नम्रता ठेवावी लागेल. आज कर्क राशीचे लोक काही अडचणीत येऊ शकतात. तुमचे आरोग्य आणखी बिघडू शकते. सर्व राशीच्या लोकांसाठी रविवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget