Shankaracharya and Ram Mandir : शंकराचार्य कोण असतात? त्यांचे हिंदू धर्मातील महत्व किती, निवड कशी होते? सध्या शंकराचार्य कोण आहेत? जाणून घ्या...
Shankaracharya and Ram Mandir : अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन 22 जानेवारीला होत आहे. मंदिराच्या उद्घाटनासाठी देश तर सज्ज झालाच आहे. देशभरात राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण आहे.
Shankaracharya and Ram Mandir : अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन 22 जानेवारीला होत आहे. मंदिराच्या उद्घाटनासाठी देश तर सज्ज झालाच आहे. देशभरात राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण आहे. सेलिब्रिटी, राजकारण्यांपासून साधू-संतांना यासाठी निमंत्रण पाठवण्यात येत आहेत. या दरम्यान शंकराचार्यांचे (Shankaracharya) नाव चर्चेत आले आहे.
कशामुळे चर्चेत आले शंकराचार्य? (Shankaracharya)
रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमात शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम हा हिंदू धर्मातील शास्त्र, विधींनुसार होत नसून त्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आक्षेप स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी घेतला आहे. त्यानंतर शंकराचार्य चर्चेत आले आहेत.
शंकराचार्य कोण असतात? (Shankaracharya)
धर्मानुसार पाहिले तर आद्य शंकराचार्यांनी मठांची स्थापना केली होती. ते हिंदूना दिशा दाखवणारे आणि धर्मगुरु होते. त्यांना जगदगुरु म्हणून देखील ओळखले जाते. शंकराचार्य सनातन धर्माची सुरक्षा आणि धर्माचा प्रसार करु इच्छित होते. त्यासाठी त्यांनी देशातील चार वेगवेगळ्या दिशांमध्ये स्थापन केलेल्या मठांची जबाबदारी त्यांच्या 4 शिष्यांवर सोपवली. या मठांच्या प्रमुखांना शंकराचार्य असे म्हटले जाते. सनातन धर्मात शंकराचार्यांना सर्वोच्च मानले जाते.
मठांचे स्वरुप कसे असते? (Shankaracharya)
सनातन धर्मानुसार, मठात गुरु आपल्या शिष्यांना सतातन धर्माचे शिकवण आणि ज्ञान देतात. हे अध्यात्मिक शिक्षण असते. या शिवाय, मठात आयुष्याचे काही महत्वाचे पैलू, समाजाची सेवा आणि साहित्य यांचे ज्ञान दिले जाते. मठ हा असा शब्द आहे, ज्याला बहुधार्मिक अर्थ आहेत. भारतात सध्या द्वारका, ज्योतिष, गोवर्धन आणि श्रृंगेरी असे प्रमुख चार मठ आहेत. संस्कृतमध्ये मठांना पीठ असे म्हटले जाते.
शंकराचार्यांची निवड कशी होते? (Shankaracharya)
शंकराचार्य या पदावर विराजमान होण्यासाठी व्यक्ती संन्यासी, वेदांत ब्राम्हण, ब्रह्मचारी असायला हवा. या शिवाय, संस्कृत, चतुर्वेद आणि पुराण या सर्वांचे ज्ञान असणे, अभ्यास असणेही महत्वाचे आहे. याशिवाय, त्या व्यक्तीने आपल्या जीवनात मुंडन, पिंडदान केलेले असावे. त्यानंतर रुद्राक्ष परिधान करणे महत्वाचे मानले. जाते. शंकराचार्य होण्यासाठी ब्राम्हण असणे अनिवार्य आहे. ज्यांना शंकराचार्य बनायचे आहे. त्यांनी आचार्य महामंडलेश्वर आणि प्रतिष्ठित संतांच्या सभेची सहमती घ्यावी लागते. याशिवाय विद्वत परिषदेची मान्यताही असायला हवी. त्यानंतर शंकराचार्य ही पदवी मिळते.
देशातील प्रमुख शंकराचार्य कोण आहेत? (Shankaracharya)
गोवर्धन मठ
ओडिशाच्या पुरी येथे गोवर्धन मठाची स्थापना करण्यात आली होती. गोवर्धन मठाच्या सन्यांश्यांनतर 'अरण्य' संप्रदायाचे नाव लावले जाते. निश्चलानंद सरस्वती असे या मठाच्या शंकराचार्यांचे नाव आहे. या मठाअंतर्गत ऋग्वेद आहे.
शारदा मठ
शारदा मठ हा गुजरातमधील द्वारकाधाम येथे आहे. सदानंद सरस्वती हे शारदा मठाचे शंकराचार्य आहेत. या मठाअंतर्गत सामवेद आहे.
ज्योतिर्मठ
उत्तराखंडच्या बद्रिकाश्रम येथे ज्योतिर्मठ आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद या मठाचे शंकराचार्य आहेत. या मठाअंतर्गत अथर्ववेद आहे.
श्रृगेरी मठ
दक्षिण भारतातील रामेश्वरम येथे श्रृंगेरी मठ आहे. जगतगुरु भारती तीर्थ या मठाचे शंकराचार्य आहेत. या मठाअंतर्गत यजुर्वेद आहे.
काय म्हणाले होते शंकराचार्य? (Shankaracharya)
स्वामी निश्चलानंद म्हणाले, 'जर कोणी या सिंहासनाशी खेळण्याचा प्रयत्न केला, तो कितीही मजबूत असला तरी तो सुरक्षित राहू शकणार नाही. मी जनतेला भडकावत नाही, पण जनता आमचा शब्द पाळते. जनमत आमच्या पाठीशी आहे, धर्मग्रंथांचे मतही आमच्या पाठीशी आहे. ऋषींचे मतही आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आम्ही सर्व बाबतीत बलवान आहोत आणि कोणीही आम्हाला दुर्बल समजू नये, असेही शंकराचार्यांनी सूचित केले.
इतर महत्वाच्या बातम्या