एक्स्प्लोर

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी

Jayant Patil Raigad : शेकापचे बालेकिल्ले असणारे अलिबाग, उरण, पनवेल, पेण या चार मतदारसंघात पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागल्याने आता त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. 

रायगड : शेकाप अर्थातच शेतकरी कामगार पक्ष एकेकाळी 28 आमदार निवडून आणणारा हा पक्ष आता अवघ्या एका आमदारावर राज्यात आपल अस्तित्व टिकवून आहे.आज पक्षाची झालेली बिकट अवस्था पाहता विधानपरिषदेवर देखील जयंत पाटील यांना आमदारांचा पाठिंबा मिळाला नाही आणि यामध्ये ते पराभव झाले. यंदाच्या निवडणुकीत शेकापचा ढासळलेला बुरुज पुन्हा मिळवू अशी तयारी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केली. मात्र रायगडचा कोणताच गड जयंत पाटील यांना मिळवता आला नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल.

विधानपरिषदेत दोन वेळा आमदार राहिलेले पक्षाचे सरचिटणीस जयंत भाई पाटील यांनी शेकापला यंदाच्या विधानसभा निवडणूकीत पूर्ण ताकदीने नवख्या उमेदवारांना रणांगणात उतरवलं. करो या मरो अशा भूमिकेत शेकाप मैदानात देखील उतरला. मात्र जयंत पाटील यांना रायगडचा एकही गड जिंकता आला नाही. 

शेकापचे बालेकिल्ले असणारे अलिबाग, उरण, पनवेल, पेण या चार मतदारसंघात पाटील यांनी नवख्या उमेदवारांना संधी दिली खरी, मात्र महायुतीची ताकद आणि अनुभवी व्यक्तींचा बोलबाला यापुढे शेकाप आपला प्रभाव पाडण्यासाठी असफल ठरला. महायुतीच्या लाटेसमोर शेकाप अखेर हरला.

शेतकरी कामगार पक्षाचा 1952 ते 1956 हा सुवर्णकाळ समजला जायचा. यावेळी शेकापचे 28 आमदार विधिमंडळात निवडून गेले होते. लोकसभेत देखील शेकापला चांगल यश मिळालं होतं. अलिबागचे दत्ता पाटील हे 1957 ला पहिल्यांदा विधानसभेवर रायगडमधून निवडून गेले. त्यानंतर शेकापने पंचायत समिती ते झेडपी असा करिष्मा कायम ठेवला. 

आतापर्यंत काही ठराविक जागेवर शेकापचा आमदार निवडून यायचा. त्यामधील रायगडचे चार गड देखील जयंत पाटील यांना आपल्याकडे ठेवण्यास यश आले होते. मात्र 2014 पासून पक्षाला खऱ्या अर्थाने उतरती कळा सुरू झाली आणि पक्षाची ताकद कमी दिसू लागली. 2019 मध्ये राज्यात एकही जागा शेकापला मिळवता आली नाही. तीच परिस्थिती यंदाच्या निवडणुकीत दिसून आली. यामुळे आता शेकापचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचं या परिस्थितीवरून समजतंय.

एकेकाळी शेकाप रायगड जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. आता मात्र चित्र बदललंय. यंदाची निवडणूक शेकापला आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची होती. मात्र रायगडचे चारही बुरुज ढासळून पडले.चार ते पाच आमदार विधिमंडळात निवडून जात असलेल्या शेकापची आजची रायगडमधील परिस्थिती का आणि कशी झाली ते पाहूयात, 

1) पक्षाचे दिग्गज नेते पक्ष सोडून गेल्याने पक्षाला उतरती कळा सुरू झाली.
2) पनवेल मधून रामशेठ ठाकूर पक्षाला रामराम ठोकत निघून गेले.
3) पेणमधून धैर्यशील पाटलांनी साथ सोडली.
4) उरणचे शेकापचे खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे विवेक पाटील यांच्यावर कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात आली. ते अजूनही अटकेत आहेत.  
5) अलिबागमधून दिलीप भोईर यांनी साथ सोडल्यानंतर त्यांनी 33 हजार मतं घेतली. ती मते शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना जिंकण्यासाठी आवश्यक होती.
6) शेकापची मुरूड मधील ढाल असलेले मनोज भगत यांनी सुद्धा पक्षाची साथ सोडून सुनील तटकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणं पसंद केलं.
7) जयंत पाटील यांचे सख्खे बंधू माजी आमदार पंडित पाटील आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांची उमेदवारीवरून नाराजी राहिल्याने त्यांनी देखील यंदाच्या निवडणुकीत सहभाग घेणे टाळले. 
8)शिवाय उरण आणि पेण मध्ये महाविकास आघाडीचा ठाकरे गटाचा उमेदवार असताना देखील जयंत पाटील यांनी त्या-त्या मतदारसंघात आपला उमेदवार रिंगणात उतरवला. त्याचा फटकासुद्धा बसला आणि शेकापचे उमेदवार पराभूत झाले. 

रायगडमधील शेतकरी कामगार पक्षाचा चार उमेदवारांचा पराभव

पनवेल - बाळाराम पाटील यांना एकूण 1 लाख 32 हजार 840 मते पडली. त्यांचा भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी तब्बल 51 हजार 091 मतांनी पराभव केला.

उरण - शेकापच्या प्रितम म्हात्रे यांना एकूण  88 हजार 878 मते मिळाली. त्यांचा भाजपचे महेश बालदी यांनी 6512 मतांनी पराभव केला. प्रितम म्हात्रे विजयाच्या उंबरठ्यावर असताना शेवटच्या फेरीत त्यांचा निसटता पराभव झाला 

अलिबाग - अलिबागमधून शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांना एकूण 84 हजार 34 मते मिळाली त्यांचा शिंदेचे महेंद्र दळवी यांनी 1 लाख 13 हजार 599 मतं घेत दळवी यांनी पाटील यांचा 29 हजार 565 मतांनी पराभव केला .

शेकापमधून भाजपमध्ये गेलेले दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांनी अपक्ष लढून 33 हजार 210 मत मिळवली. या मतांची विभागणी झाल्याने चित्रलेखा पाटील यांना याचा फटका बसला.

पेण - पेण विधानसभेत लंडनहून मास्टर ऑफ आर्किटेक्ट डिग्री घेऊन आलेले अतुल म्हात्रे यांना अवघी  29 हजार 191 मते मिळाली. तर विजयी भाजपचे उमेदवार रविशेठ पाटील यांना 1 लाख 24 हजार 631 मते मिळाली. पाटील यांनी अतुल म्हात्रे यांचा तब्बल 95,440 मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला.

राज्यातल्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या शेकापची ताकद आता पूर्वीपेक्षा हळूहळू कमी होत चालली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शेकापला राज्यात फक्त एकच जागेवर समाधान मानावं लागलं. रायगड जिल्ह्यातील चारही बुरुज शेकापचे ढासळून पडले. त्यामुळे शेकाप जिल्ह्यात खालच्या स्थानी पोहचला आहे. पक्षाची झालेली ही अवस्था पाहता पक्षश्रेष्ठी आगामी काळातील निवडणुकांसाठी पक्ष टिकवण्यावर कसा भर देत आहेत हे पाहणे महत्वाचे राहील.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Dshmukh Nagpur : कर्जमाफीच्या आश्वासनाप्रमाणे अधिवेशनातच घोषणा करा - अनिल देशमुख9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 16 डिसेंबर 2024: ABP MAJHADCM Eknath Shinde : श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात मंत्रिपदंNagpur Banners : विधान भवनाबाहेर नेत्यांना शुभेच्छा देणारे मोठ मोठे बॅनर्स लावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
Parbhani Band: सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
Mumbai Crime News: फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
Embed widget