Gold Rate Today : सोनं-चांदी महागली! खरेदीआधी आजचे दर जाणून घ्या
Gold Price Today : आज 14 जानेवारी 2024 ला देशातील सोने आणि चांदीचे दरात किंचित वाढ झाली आहेत. दरम्यान, 2024 वर्षात सोनं 70,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
Gold Silver Rate Today, 14 January 2024 : आज देशात सोन्याच्या किमतीत वाढ (Gold Rate Today) झाली आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही (Silver Rate Today) वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, 14 जानेवारील आज सोन्याची किंमत किंचित घसरली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर (22K Gold Price Today) 5800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर (24K Gold Price Today) 6327 रुपये प्रति ग्रॅम आहे. दिल्लीत 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर (24K Pure Gold rate) 63,270 रुपये आहे. मुंबईत सोन्याचा दर 63,270 रुपये (Gold Price Today) आहे. चेन्नईत सोन्याचा दर 58,450 रुपये आहे. यासोबतच, चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत असून, आज चांदीची किंमत 76,500 रुपये प्रति किलोग्रॅमवर (Silver Price Today) पोहोचली आहे.
सोन्यासह चांदीही महागली
आज सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदीच्या किमतीत 500 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आज एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे. दिल्लीमध्येही चांदीच भाव सारखाच आहे. चेन्नईमध्ये आज चांदीचा दर 78,000 रुपये किलो आहे.
दिल्लीतील आजचा सोन्याचा दर किती?
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्यासाठी ग्राहकांना 63,270 रुपये प्रति 10 ग्रॅम मोजावे लागत आहेत.
चेन्नईत सोन्याचा सोन्याची किंमत काय?
चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर 58,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,760 रुपये आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव काय?
मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 58,000 रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 63,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोलकातामध्ये सोन्याचा लेटेस्ट दर काय?
कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्यासाठी ग्राहकांना 63,270 रुपये प्रति 10 ग्रॅम मोजावे लागत आहेत.
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)
- पुणे - आज पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
- नाशिक - 24 कॅरेट सोने 63300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)
- नागपूर - 24 कॅरेट सोने 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)
- कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 62870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)
सोनं 70000 वर पोहोचणार
नवीन वर्षात सोन्याचा दर 70,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. चालू जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक राजकीय तणावामुळे सोन्याचा भाव यावर्षी 2024 मध्ये प्रति 10 ग्रॅम 70,000 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचेल, असे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने म्हटले आहे.