एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Cidco Mass Housing lottery 2024 नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”या महागृहनिर्माण योजनेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत असून योजनेचा प्रारंभ केल्यापासून सुमारे एक महिन्याच्या कालावधीत 92 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या गृहनिर्माण योजनेकरिता अधिकाधिक नागरिकांना अर्ज करता यावा याकरिता योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीसही 11 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

सिडकोतर्फे 11 ऑक्टोबर 2024 रोजी “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येऊन सदर योजनेंतर्गत नवी मुंबईच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता 26,000 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. अर्जदारांना आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. 

परवडणाऱ्या दरासह परिपूर्ण पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हीटी, दर्जेदार बांधकाम आणि नवी मुंबईतील समृद्ध जीवनशैली अनुभवण्याची संधी या गृहनिर्माण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. सिडकोच्या अन्य गृहनिर्माण योजनांप्रमाणेच या गृहनिर्माण योजनेसही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभून आजपर्यंत 92 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. 

योजनेकरिता अधिकाधिक नागरिकांना अर्ज करता येऊन त्यांचे घराचे स्वप्न साकार व्हावे याकरिता योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 11 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यात आल्याने अर्जदारांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र इ. आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठीही पुरेसा अवधी मिळणार आहे.  

तसेच ऑनलाइन नोंदणी करताना बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अटही शिथिल करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना बारकोड नसलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे; परंतु वाटपपत्र देण्यापूर्वी बारकोड असलेले रहिवास प्रमाणपत्र सादर करणे अर्जदारांना अनिवार्य असणार आहे. तसेच रु. 100/- किंवा रु. 500/- मूल्याच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र/वचनपत्र सादर करण्याची अटही शिथिल करण्यात आली आहे. अर्जदारांना कोऱ्या कागदावर स्वसाक्षांकित शपथपत्र/वचनपत्र सादर करता येणार आहे. 

या गृहनिर्माण योजनेद्वारे नवी मुंबईसारख्या सोयी सुविधांनी सुसज्ज शहरामध्ये घराचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना लाभली आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी आपले घराचे स्वप्न साकार करण्यासाठी योजनेकरिता अर्ज करावा.

इतर बातम्या :

सोनं होतंय स्वस्त महाग? मग 'असा' लावा भारी दिमाग; 5 पद्धतीने करा गुंतवणूक, भविष्यात मिळेल बक्कळ पैसा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
Embed widget