एक्स्प्लोर

Morning Headlines 10th March : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

अनूप चंद्र पांडे निवृत्त, अरुण गोयल यांचा राजीनामा; आगामी लोकसभा निवडणुकांची धुरा आता एकट्या राजीव कुमार यांच्या खांद्यावर?

Election Commission Of India: देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे लोकसभेच्या तारखा कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनीही अरुण गोयल (Arun Goel) यांचा राजीनामा मंजूर केला. तीन सदस्य असलेल्या निवडणूक आयोगामध्ये आधीपासूनच एका आयुक्ताचं पद रिक्त होतं. आता अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर केवळ मुख्य निवडणूक आयुक्त आयोगामध्ये शिल्लक राहिले आहेत. विशेष म्हणजे, अरुण गोयल यांनी कार्यकाल संपण्याच्या तीन वर्ष आधीच राजीनामा दिल्यानं जोरदार चर्चा सुरू आहे. वाचा सविस्तर 

मोठी बातमी: शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंचीही घोषणा, मुंबईतील उमेदवार जाहीर!

Lok Sabha Election 2024 : बारामतीचा उमेदवार (Baramati Loksbha Election) म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नावाची शरद पवारांकडून (Sharad Pawar) घोषणा करण्यात आली असतानाच, महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून (Mumbai North West Lok Sabha Constituency) अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) आपला लोकसभेचा उमेदवार असणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून करण्यात आली आहे. जुहू येथील कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे. वाचा सविस्तर 

गॅस सिलेंडर स्वस्त, मग पेट्रोल-डिझेलही स्वस्त होणार का? सरकारची नेमकी भूमिका काय?

Petrol and Diesel Price : सध्या देशात अनेक दिवसापासून पेट्रोल डिझेलचे दर (Petrol and Diesel Price) स्थिर आहे. तेल विपणन कंपन्यांकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, सध्या सरकारने  6 महिन्यात दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळं पेट्रोल डिझेलचे दरही कमी होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मात्र, यावर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग (Union Minister Hardeep Singh) यांनी स्पष्टीकरण दिलंय. वाचा सविस्तर 

Weather Update : देशासह राज्यांमध्ये पुन्हा हवामान बदलणार, काही ठिकाणी पावसाची शक्यता, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम

Weather Update : देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा हवामान बदलणार आहे. महाराष्ट्रातील स्थिती पाहता हवामान चक्राच्या बदलामुळे मागील काही आठवड्यात ऐन हिवाळ्यात पावसाचा अनुभव, तर आता पहाटे थंडी, दुपारी कडाक्याच्या उन्हाचा अनुभव घ्यावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अंदाज वर्तवला आहे की 11 ते 14 मार्चपर्यंत पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. 12 ते 14 मार्च या कालावधीत आजूबाजूच्या मैदानी भागात तुरळक पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल आणि केरळमध्ये पुढील 2 दिवसांत उष्णता वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वाचा सविस्तर

Miss World 2024 Krystyna Pyszkova : "मिस वर्ल्ड 2024'चा किताब जिंकणं माझ्यासाठी स्वप्नवत"; विश्वसुंदरीचा बहुमान मिळताच क्रिस्टिना पिस्कोव्हाची पहिली प्रतिक्रिया

Miss World 2024 Krystyna Pyszkova : 'मिस वर्ल्ड 2024'चा (Miss World 2024) महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. 71 व्या सोहळ्याचं भारतात आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा (Krystyna Pyszkova) यंदाची विश्वसुंदरी ठरली आहे. वाचा सविस्तर 

Sevier Medical Condition: घशात खवखव, त्यानंतर असह्य वेदना; औषधांनीही फरक पडेना, डॉक्टरांना गाठून तपासण्या केल्या, अन्...

Sevier Medical Condition: जगभरात अनेक घडामोडी दररोज घडत असतात. अनेकदा अशी मेडिकल कंडिशन (Medical Condition) समोर येते, ज्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतं. नुकतंच व्हिएतनाममधील एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं. त्या व्यक्तीला घशाचा त्रास होत होता, औषधं (Medicines) घेतली, प्राथमिक उपचार झाले मात्र आराम काही मिळेना. हळूहळू त्रास वाढला आणि त्या व्यक्तीचा आवाजही खूप बदलला. तेव्हा मात्र तो घाबरला आणि स्पेशालिस्टकडे धाव घेतली, त्याची तात्काळ तपासणी करण्यात आली. वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget