Sevier Medical Condition: घशात खवखव, त्यानंतर असह्य वेदना; औषधांनीही फरक पडेना, डॉक्टरांना गाठून तपासण्या केल्या, अन्...
Sevier Medical Condition: सुरुवातीला घशाच्या त्रासाला किरकोळ समजून या व्यक्तीनं दुर्लक्ष केलं, पण एक दिवस जेव्हा त्याच्या थुंकीतून रक्त पडलं, त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. रक्त पागून व्यक्तीच्या पायाखालची जमिन सरकली.
Sevier Medical Condition: जगभरात अनेक घडामोडी दररोज घडत असतात. अनेकदा अशी मेडिकल कंडिशन (Medical Condition) समोर येते, ज्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतं. नुकतंच व्हिएतनाममधील एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं. त्या व्यक्तीला घशाचा त्रास होत होता, औषधं (Medicines) घेतली, प्राथमिक उपचार झाले मात्र आराम काही मिळेना. हळूहळू त्रास वाढला आणि त्या व्यक्तीचा आवाजही खूप बदलला. तेव्हा मात्र तो घाबरला आणि स्पेशालिस्टकडे धाव घेतली, त्याची तात्काळ तपासणी करण्यात आली.
सुरुवातीला घशाच्या त्रासाला किरकोळ समजून या व्यक्तीनं दुर्लक्ष केलं, पण एक दिवस जेव्हा त्याच्या थुंकीतून रक्त पडलं, त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. रक्त पागून व्यक्तीच्या पायाखालची जमिन सरकली. त्याला धक्का बसला. सर्वात आधी त्यानं आरशात पाहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याला घशाच्या इथे काहीतरी आढळून आलं. तो घाबरला आणि तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यावेळी तपासात जे उघड झालं, त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. वास्तविक त्याच्या गळ्यात एक जळू अडकली होती.
डॉक्टरांना धक्का बसला, त्यांनी रुग्णाची तात्काळ एन्डोस्कोपी केली. ज्यामध्ये असं दिसून आलं की, 6 सेंटीमीटर लांबीची जळू त्याच्या घशात अडकली होती, जी श्वासनलिकेजवळील ग्लोटीसच्या खाली चिकटून बसली होती. डॉक्टरांनी तात्काळी व्यक्तीच्या घशातून जळू काढली. आजवरच्या करिअरमध्ये अशी घटना पहिल्यांदाच पाहिल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यापूर्वी विकनममधून असा प्रकार समोर आल्याचं सांगितलं. जळू सारख्या गोष्टी सामान्यतः स्पच्छतेच्या अभावामुळे शरीरात प्रवेश करू शकतात.
घशात जळू गेलीच कशी?
आता प्रश्न असा आहे की, व्यक्तीच्या घशात जळू गेलीच कशी? डॉक्टरांनी 53 वर्षीय व्यक्तीला हे विचारलं असता, त्यानं आठवण करून दिली आणि उत्तर दिलं की, सुमारे एक महिन्यापूर्वी उंदीर पकडताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती. त्यावेळी त्यानं एका औषधी झाडाची पानं तोडून थेट तोडांत टाकली आणि चावली. जखमेवर लावता याव्यात म्हणून चावून चावून पेस्ट बनवली. त्याचवेळी जळू शरीरात शिरली असावी. डॉक्टरांनी समजावून सांगितलं की, न धुतलेली पानं तोंडात घालणं मूर्खपणाचं आहे, ज्यामुळे लहान जळू त्याच्या शरीरात जाऊ शकतात. जळू फारच लहान असतात, परंतु सतत रक्त प्यायल्यामुळे त्या काही काळातच मोठ्या होऊ शकतात.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )