एक्स्प्लोर

अनूप चंद्र पांडे निवृत्त, अरुण गोयल यांचा राजीनामा; आगामी लोकसभा निवडणुकांची धुरा आता एकट्या राजीव कुमार यांच्या खांद्यावर?

Election Commission Of India: आता अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर केवळ मुख्य निवडणूक आयुक्त आयोगामध्ये शिल्लक राहिले आहेत. विशेष म्हणजे, अरुण गोयल यांनी कार्यकाल संपण्याच्या तीन वर्ष आधीच राजीनामा दिल्यानं जोरदार चर्चा सुरू आहे.

Election Commission Of India: देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे लोकसभेच्या तारखा कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनीही अरुण गोयल (Arun Goel) यांचा राजीनामा मंजूर केला. तीन सदस्य असलेल्या निवडणूक आयोगामध्ये आधीपासूनच एका आयुक्ताचं पद रिक्त होतं. आता अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर केवळ मुख्य निवडणूक आयुक्त आयोगामध्ये शिल्लक राहिले आहेत. विशेष म्हणजे, अरुण गोयल यांनी कार्यकाल संपण्याच्या तीन वर्ष आधीच राजीनामा दिल्यानं जोरदार चर्चा सुरू आहे.

काही दिवसांतच आगामी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. सध्या देशाची धुरा सांभाळत असलेल्या केंद्र सरकारचा कार्यकाळ जून महिन्यात संपत आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाला देशभरात लोकसभा निवडणुका घ्यायच्या आहेत. आगामी 18व्या लोकसभेसाठी प्रतिनिधींची निवड करायची आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग कधीही लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतं. पुढील आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसं झालं तर मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर मात्र मोठा पेच असणार आहे. अनुप चंद्र पांडे यांची निवृत्ती आणि अरुण गोयल यांनी दिलेला राजीनामा यांमुळे आता सर्व धुरा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या एकट्याच्याच खांद्यावर असणार आहे, असं चित्र दिसतंय. 

सध्या निवडणूक आयोगात राजीव कुमार हे एकमेव निवडणूक आयुक्त आहेत. सर्वसाधारणपणे निवडणूक आयोगात तीन निवडणूक आयुक्त असतात, मात्र आता दोन निवडणूक आयुक्तांची जागा रिक्त आहे. अरुण गोयल यांचा राजीनामा आणि अनुप चंद्र पांडे यांच्या निवृत्तीनंतर दोन निवडणूक आयुक्तांची पदे रिक्त झाली आहेत. अशातच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना लोकसभा निवडणुकीची धुरा एकट्यानंच सांभाळावी लागणार आहे. 

नव्या निवडणूक आयुक्तांची निवड कशी होणार?

नव्या निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीमध्ये पंतप्रधान, एक कॅबिनेट मंत्री (जे पंतप्रधान निवडतात) आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश होतो. ही समिती निवडणूक आयुक्तपदासाठी नावाची शिफारस करते. या शिफारशीच्या आधारे राष्ट्रपती नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करतात. निवडणूक आयुक्तांचा एकूण कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. मुख्य निवडणूक आयुक्तांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांचं निवृत्तीचं वय 62 वर्ष आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Arun Goel Resigns : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा, तीन वर्षे आधीच राजीनामा दिल्याने खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Speech beed | तुतारीकडून पराभव..सगळं विसरा; माफ करणारा राजा, पंकजा मुंडेंचा भाषणUddhav Thackeray Speech : मुठभर असतील तरी चालतील पण निष्ठावंत हवे; ठाकरेंचं तुफान भाषणCM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारलाUddhav Thackeray Ausa Bag Checking : औसा येथे पुन्हा एकदा बॅगची तपासणी; सलग दुसऱ्यांदा तपासणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Embed widget