एक्स्प्लोर
आनंदाची बातमी! मान्सून अंदमानमध्ये दाखल

पुणे : बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने काल अंदाज वर्तवला होता की, 72 तासांत मान्सून अंदमानात दाखल होईल. मात्र, मान्सून आजच अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या सात दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने 2017 साठी वर्तवलेल्या मान्सूनच्या पहिल्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या जवळ पाऊस पडेल. गेल्यावर्षी 18 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग























