एक्स्प्लोर
हिंदूंनी जास्त मुलांना जन्म द्यावा, मोहन भागवतांचं आवाहन

आग्रा : हिंदू नागरिकांनी जास्त मुलांना जन्म द्यावा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जर इतर धर्मीय इतक्या मुलांना जन्म देऊ शकतात, तर तुम्हाला कोणी अडवलंय? असा सवाल भागवतांनी यावेळी उपस्थित केला. हिंदूंची लोकसंख्या कमी होत असल्यामुळे भागवतांनी हा सल्ला दिला आहे. आग्र्यातील एका कार्यक्रमात मोहन भागवतांनी हे आवाहन केलं आहे.
हिंदूंनी जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे असं आवाहन यापूर्वी प्रविण तोगडिया, साक्षी महाराज, साध्वी प्राची यांनी केलं होतं. त्यावरुन मोठा गदारोळही माजला होता. मात्र आता साक्षात सरसंघचालकांच्या अशा वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















