एक्स्प्लोर
लक्झरी गाड्यांना नकार, राजदूतांचा रिक्षातून प्रवास
नवी दिल्ली : उच्च पदावरील अधिकारी किंवा राजदूतांसाठी सेडान किंवा एसयूव्ही यांसारख्या लक्झरी गाड्यांचा ताफा पाहायला मिळतो. मात्र मेक्सिकोच्या भारतातील राजदूत मेल्बा प्रिआ यांनी मात्र हा समज खोटा ठरवला. त्यांनी कुठेही प्रवेश केल्यास अनेकांच्या भुवया उंचावतात. कारण त्या लक्झरी गाडीने नाही तर चक्क ऑटोरिक्षाने सगळीकडे प्रवास करतात. राजधानी दिल्लीत उन्हाळा असो वा हिवाळा, मेल्बा प्रिआ रिक्षानेच प्रवास करतात.
दिल्लीमध्ये प्रवासाचं साधन म्हणून मेल्बा प्रिआ यांनी रिक्षाला पसंती दिली आहे. फुलांचं डिझाईन आणि पांढऱ्या रंगाने रंगवलेली रिक्षा, टाय आणि फॉर्मल शर्टमधला चालक, निळ्या रंगाची डिप्लोमॅटिक नंबर प्लेट आणि मेक्सिकोचा झेंडा, अशा या रिक्षात मेल्बा प्रिआ प्रवास करतात.
मेल्बा यांची रिक्षा चालवण्यासाठी एक सरकारी चालकही आहे. राजेंद्र कुमार असं या चालकाचं नाव आहे. मेल्बा यांना प्रत्येक कार्यक्रमात घेऊन जाण्याची जबाबदारी राजेंद्र कुमार यांची आहे.
रिक्षामुळे अनेक अडचणी
मेल्बा प्रिआ यांना रिक्षामुळे अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतो. कारण रिक्षासोबत आलेल्या मेल्बा यांना संसद, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये प्रवेश सहजासहजी प्रवेश मिळत नाही.
काही दिवसांपूर्वी इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र आयोजकांनी रिक्षातून आलेल्या मेल्बा प्रिआ यांना प्रवेश आणि पार्किंग करण्यास परवानगी दिली नाही. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला मेल्बा प्रिआ आमंत्रण होतचं पण त्या सार्वजनिक प्रवासाच्या साधनांचा मुद्दा यावर भाषण देणार होत्या. मात्र या प्रकारानंतर मेल्बा प्रिआ चर्चेत आल्या होत्या.
ऑड-इव्हन फॉर्म्युला अतिशय चांगला पर्याय
मेल्बा प्रिआ यांच्याकडे सीएनजी ऑटोरिक्षा आहे. पर्यावरणाच्या काळजीसाठी प्रत्येकाला असा प्रयत्न करायला हवा, असं मेल्बा म्हणणं आहे.
रिक्षातून प्रवास करण्याचं हेच कारण नाही. मेल्बा यांना दिल्लीतील ऑड-इव्हन फॉर्म्युल्यावर प्रचंड विश्वास आहे. ऑड-इव्हन फॉर्म्युला हा चांगला उपाय आहे, असं त्यांना वाटतं. तसंच दिल्लीच्या ट्रॅफिकमध्ये रिक्षाचा प्रवास योग्य पर्याय असल्याचंही त्या सांगतात.
काही वर्षांपूर्वी आलेल्या अनिल कपूरच्या 'नायक' सिनेमात एक सीन आहे. एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर अनिल कपूर रिक्षातून येतो. त्यावेळी त्याचा पीए असलेले परेश रावल यांचा डायलॉग आहे. "यहाँ छोटा-मोटा टोयोटा में आता और सीएम ऑटो में..." मेक्सिकोच्या भारतातील राजदूत मेल्बा प्रिआ यांना पाहिलं तर या नायकमधल्या या सीनची आणि डायलॉगची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement