एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Govt Formation | नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर शरद पवार म्हणतात....
शरद पवार-नरेंद्र मोदी भेट नेहमी खिचडीच नसते, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेटीपूर्वी म्हणाले होते.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठक संपली आहे. संसद भवनात दोन्ही नेत्यांमध्ये पाऊणतास चर्चा झाली. "या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली, राजकीय परिस्थितीवर नाही," अशी माहिती शरद पवार यांनी भेटीनंतर दिली. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत असतानाच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्या बैठकीनंतर तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदींमध्ये अर्धा तास बैठक झाली.
पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत शेतकरीप्रश्नी चर्चा झाली पण राजकीय चर्चा झाली नाही, अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे. यावेळी पवारांनी राज्यातील नुकसानाची माहिती नरेंद्र मोदींना देत वसंतदादा इन्स्टिट्यूटतर्फे पुण्यात होणाऱ्या साखरेच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचं निमंत्रणही दिल्याची माहिती मिळत आहे. ही कॉन्फरन्स 31 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
शेतकरी प्रश्नी मोदींची भेट : शरद पवार
या भेटीची माहिती शरद पवार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ते लिहितात की, "महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यंदा अवकाळी पावसाने कहर केला, ज्यामुळे महाराष्ट्रातील 325 तालुक्यातील 54.22 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचं मोठं नुकसान झालं. याची पाहणी करण्यासाठी मी नोव्हेंबरच्या सुरुवातीला नाशिक आणि विदर्भाचा दौरा केला, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बोललो, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. परतीच्या पावसामुळे राज्यातील जवळपास सर्वच उभं पीक आडवं झालं. पंतप्रधानांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं."
Met @PMOIndia Shri. Narendra Modi in Parliament today to discuss the issues of farmers in Maharashtra. This year the seasonal rainfall has created Havoc engulfing 325 talukas of Maharashtra causing heavy damage of crops over 54.22 lakh hectares of area. pic.twitter.com/90Nt7ZlWGs
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 20, 2019
संबंधित बातमी शरद पवारांचे गुगली अस्त्र, 18 दिवसांमध्ये 10 विधानेसंसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात मोदी आणि पवार यांची जवळपास पाऊण तास चर्चा.महाराष्ट्रातल्या ओल्या दुष्काळाबद्दल केंद्रानं तातडीनं मदत करण्याची विनवणी. काही राजकीय चर्चा झाली का याबद्दल विचारल्यावर पवार खळखळून हसले. pic.twitter.com/raeqYAnxz5
— prashant kadam (@_prashantkadam) November 20, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
रायगड
क्रिकेट
Advertisement