एक्स्प्लोर

गोव्यात मनोहर पर्रिकर यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बहुमतासाठीची अग्निपरीक्षा पार पाडली आहे. गोवा विधानसभेत भाजपने 16 विरुद्ध 22 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गोवा विधानसभेत आज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करायचं होतं. सभागृहाचं कामकाज सकाळी 11.30 च्या सुमारास सुरु झाली. 40 जागांच्या गोवा विधानसभेत 13 जागा मिळवणाऱ्या भाजपच्या समर्थनार्थ 22 आमदारांनी मतदान केलं. तर 17 आमदारांनी सरकारविरोधात मत केलं. तर मतदानापूर्वी काँग्रेस आमदार विश्वजीत राणे यांनी सभात्याग केला. अशाप्रकारे पर्रिकर यांनी विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक 21 आमदारांचा आकडा सहजरित्या पार केला. पर्रिकरांचा शपथविधी गोव्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांचा मंगळवारी 14 मार्चला शपथविधी झाला. पर्रिकरांनी कोकणी भाषेत शपथ घेतली. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रिकर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक 17, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षांना 3 आणि राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. त्यातील मगोप, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि दोन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचं संख्याबळ 21 वर आलं. सुप्रीम कोर्टाचे आदेश मुख्यमंत्री झालेल्या पर्रिकरांना अवघ्या 48 तासात म्हणजे बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. सरन्यायाधीश जे.एस.खेहर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. शपथविधीपूर्वीही बराच गोंधळ पाहायला मिळाला. पर्रिकर यांच्या शपथविधीला काँग्रेसनं थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र, कोर्टानेही राज्यपालांप्रमाणेच निर्णय देत, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश काँग्रेसला दिले. मनोहर पर्रिकर यांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची काँग्रेसची मागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. मनोहर पर्रिकरांच्या मंत्रिमंडळात कोण-कोण? मनोहर पर्रिकर – मुख्यमंत्री, भाजप फ्रांसिस डिसूजा- भाजप पांडुरंग मडकेकर- भाजप सुदिन ढवळीकर- मगोप मनोहर त्रिंबक अजगांवकर- मगोप विजय सरदेसाई- गोवा फॉरवर्ड पार्टी विनोद पलियंकर- गोवा फॉरवर्ड पार्टी जयेश विद्याधर साळगांवकर- गोवा फॉरवर्ड पार्टी गोविंद गौडे- अपक्ष रोहन खाउंटे- अपक्ष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकडवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Dshmukh Nagpur : कर्जमाफीच्या आश्वासनाप्रमाणे अधिवेशनातच घोषणा करा - अनिल देशमुख9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 16 डिसेंबर 2024: ABP MAJHADCM Eknath Shinde : श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात मंत्रिपदंNagpur Banners : विधान भवनाबाहेर नेत्यांना शुभेच्छा देणारे मोठ मोठे बॅनर्स लावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकडवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
Parbhani Band: सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
Mumbai Crime News: फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
Embed widget