एक्स्प्लोर

Manipur Violence: 'मणिपूरमधील आजच्या स्थितीला काँग्रेसच जबाबदार', मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा घणाघात

Manipur Violence : मणिपूर हिंसाचारावर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये (Manipur) सुरु असलेल्या हिंसाचारासाठी (Violence) मुख्यमंत्री एन  बिरेन सिंह यांना जबाबदार ठरवले जात आहे. गुरुवार (24 ऑगस्ट) रोजी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्गदर्शन केले.'तसेच त्यांच्या मार्गदर्शनानंतर राज्यामध्ये शांतता निर्माण झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार बिरेन सिंह यांना म्हटलं की, 'आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा सल्ला घेत आहोत. संसदेतील पंतप्रधान मोदी यांचं मणिपूरवरील भाषणानंतर राज्यामध्ये सध्या शांतता आहे.' दरम्यान लोकांचे पुनर्वसन करण्याचे काम सध्या सुरु असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. 

काय म्हणाले मुख्यमत्री एन बिरेन सिंह?

मणिपूरच्या हिंसाचारावर राहुल गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. यावर बोलतांना बिरेन सिंह यांनी म्हटलं की, 'राहुल गांधी हे लडाखच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी लडाखविषयी बोलावं. आज मणिपूमध्ये जे घडत आहे त्यासाठी काँग्रेसच जबाबदार आहे. माणसांच्या आयुष्याशी राजकारण केलं नाही पाहिजे.'

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी घेतली अमित शाह यांची भेट

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी गुरुवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील सद्य परिस्थितीची कल्पना अमित शाह यांना दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देखील त्यांनी यावेळी अमित शाह यांना दिली आहे. 

या बैठकीमध्ये मणिपूरच्या राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाह यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री देखील होते. गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याआधी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी म्हटलं होतं की, 'आम्ही इथे गृहमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत.' 29 ऑगस्ट रोजी मणिपूरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. 

मणिपूरच्या स्थितीविषयी सांगताना बिरेन सिंह यांनी म्हटलं की, 'मणिपूमधील स्थिती हळूहळू सुधारत आहे. मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जातीय दंगली सुरु आहेत. यामध्ये आतापर्यंत 160 पेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. 

हेही वाचा : 

Manipur Violence : मणिपूरच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने सादर केला अहवाल; सरकारला दिले 'हे' निर्देश

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
PoK Protest : ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget