एक्स्प्लोर

मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!

हिंगोली लोकसभेचे (Hingoli Lok Sabha) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Bapurao Patil Ashtikar) यांच्या शपथेवर आक्षेप घेण्यात आला.

नवी दिल्ली : हिंगोली लोकसभेचे (Hingoli Lok Sabha) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Bapurao Patil Ashtikar) यांच्या शपथेवर आक्षेप घेण्यात आला. नागेश पाटील आष्टीकर यांनी संसदेत मराठीत शपथ घेतली. मात्र यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण केलं. त्यावर हंगामी लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत, दुरुस्ती सुचवली. शपथ घेताना जे लिहिलं आहे, त्यानुसारच शपथ घेणं आवश्यक असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. त्यामुळे आष्टीकरांना पुन्हा एकदा शपथ घ्यावी लागली.

नागेश पाटील आष्टीकर यांनी शपथेच्या सुरुवातीला म्हटलं की, मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने, दत्त महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,व माझे वडील  बापूराव पाटील आष्टीकर यांना स्मरुन शपथ घेतो की, मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती श्रद्धा व निष्ठा बाळगीन. आणि भारतीय एकात्मतेचे स्मरण करेन, जे कर्तव्य मला प्राप्त होते, ते नेकीने पार पाडेन.

आष्टीकर शपथ घेत असताना, अध्यक्षांनी त्यांना थांबवलं

आष्टीकर यांनी अशी शपथ घेत असताना, अध्यक्षांनी त्यांना थांबवलं आणि जे लिहिलं आहे तेच वाचायला सांगितलं. असं चालणार नाही, जे मराठीत लिहिलं आहे तेच वाचावं लागेल, तशीच शपथ घ्यावी लागेल, असं सांगितलं. त्यानंतर मग नागेश पाटील आष्टीकर  यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. यावेळी त्यांनी अन्य नावांचा उल्लेख टाळत जशी लिहिली आहे तशीच शपथ घेतली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जात होती. या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना सुरु होता. यामध्ये  ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटाच्या बाबूराव कदम यांचा पराभव केला.

'या' नवीन खासदारांनी घेतली शपथ

चंद्रपूर लोकसभेच्या खसादर प्रतिभा धानोरकर, छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी देखील शपथ घेतली. तसेच परभणीचे खासदार संजय जाधव, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण, जालन्याचे खसदार कल्याण काळे,, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, हेमंत सावरा, निलेश लंके, सुरेश म्हात्रे, सुनिल तटकरे, श्रीरंग बारणे या नवीन खासदारांनी देखील आज शपथ घेतली. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज लोकसभेत निवडूण आलेल्या सर्व सदस्यांचा शपथविधी पार पाडला. यावेळी महाराष्ट्रातील खासदारांनी शपथ घेतली.  

महत्वाच्या बातम्या:

Parliament Session 2024 : संसदेत शपथ घेताच मोदी आणि राहुल गांधी पहिल्याच दिवशी आमनसामने; दोघांच्या भेटीत काय घडलं?

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून मास कम्युनिकेशन | डिजीटल जर्नालिझममध्ये एक तप | प्रहार, एबीपी माझा, टीव्ही 9 मराठी आणि पुन्हा एबीपी माझा असा आजवरचा डिजीटल जर्नालिझमचा प्रवास | टीव्ही 9 मराठी वेबसाईट डेव्हलपिंग, लॉचिंग ते नंबर वनपर्यंतची झेप | मराठी यूट्यूब व्हिडीओमध्ये महिन्याला 300M चा टप्पा गाठणाऱ्या पहिल्या टीमचं नेतृत्व | सध्या एबीपी माझा डिजीटल टीमची धुरा | कॉमस्कोर, गुगल आणि यूट्यूब अॅनालिटिक्समध्ये नंबर वन |  नवे प्रयोग करण्याला प्राधान्य, नवे पल्ले गाठण्याचा ध्यास | Passionate journalist with a track record of success in digital media. Currently serving as a Digital Editor, I've propelled ABP Majha's Webiste & YouTube channel to the number one spot, transitioning from Video Head to Digital Lead.  Managing a dynamic team of over 40+ professionals, my focus is on vertical growth, strategic social media planning, SEO implementation, and achieving target-oriented results.  Through teamwork and collaboration, my team successfully made ABP Majha's website rank number one in ComScore rankings, solidifying its digital dominance.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Army Social Media Policy : सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी

व्हिडीओ

Sanjay Raut Shiv sena : गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात, राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? कृष्णराज महाडिक म्हणाले..
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Army Social Media Policy : सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
Embed widget