एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?

Premachi Goshta Serial Update : सावनी मुक्ताला ड्रेस, फॅशनवरून बोलते. त्यावर सागर मुक्ताच्या बाजूने उभा राहतो. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय पाहणार?

Premachi Goshta Serial Update :  सागर आपले मुक्तावरील प्रेम सिद्ध करण्याची एकही संधी सोडत नाही. मुक्तावर होणारा प्रत्येक वार सागर परतवून लावतो. सावनी मुक्ताला ड्रेस, फॅशनवरून बोलते. त्यावर सागर मुक्ताच्या बाजूने उभा राहतो.  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आज काय पाहणार?

सावनी फॅशन डिझायनरवर चिडणार

सावनीसाठी फॅशन डिझायनरची तिच्यासाठी ड्रेस घेऊन येते. पण, सावनीला तो ड्रेस आवडत नाही. यावरुन सावनी  अस्टिस्टंटला उलटसुलट बोलते आणि तिचा अपमान करते. सावनी तिला करिअर उद्धवस्त करण्याची धमकी देते. सावनीकडून होत असलेल्या अपमानामुळे  फॅशन डिझायनरच्या अस्टिस्टंटला रडू कोसळते. 

सावनी मुक्ताला फॅशन सेन्सवरून सुनावणार

चिडलेल्या सावनीला शांत करण्यासाठी मुक्ता तिला ड्रेस छान आहे असे सांगते. यावर सावनी मुक्तावर तिच्यावर चिडते आणि तुला फॅशनबद्दल काहीच सेन्स नसल्याचे म्हणते. तुला हा ड्रेस आवडला असेल तर तू हा ड्रेस ठेव, माझ्याकडून गिफ्ट म्हणून समज. तसेही मी रिजेक्ट केलेल्या गोष्टी तुला आवडतात असे सावनी म्हणते. सागरने तुला सिलेक्ट कसे केले, बॅड चाईस आहे असे म्हणते. तेवढ्यात सागर येतो आणि सावनीला म्हणतो की मुक्ताच्या घरात राहून तू माज दाखवतेस.  ज्या मुक्ताला तू साडीवरून बोलतेय ती साडी त्यांच्या पैशाने, मेहनतीने घेतले असल्याचे सांगतो. तुझ्यासारखं नाही दुसऱ्याच्या कमाईवर मजा मारत. पूर्वी माझ्या पैशांवर माझ्या करायचीस आणि आता त्या तुझ्या बॉयफ्रेंडच्या पैशांवर मजा करतेस. स्वतः दमडी कमवायची तुला अक्कल नाही आणि दुसऱ्यांना शिकवतेस असे सणसणीत प्रत्युत्तर सागर देतो. 

हर्षवर्धनची होणार चिडचिड....

सावनी हर्षवर्धनला फोन करून ड्रेस बाबत तक्रार करते. मला माझ्या आवडीचा तातडीने ड्रेस हवाय असे सांगते. सावनीच्या या तगाद्याने हर्षवर्धन चिडतो. हिचे हट्ट कधी थांबणार असे तो सत्यमला विचारतो. काहीही झालं तरी मला या बंधनात अडकायचे नाही असे हर्षवर्धन सत्यमला सांगतो. मला सावनी मध्ये इंटरेस्ट नाही. मला आता दुसरी हिरवळ सापडली असल्याचे सांगतो. सत्यम त्याला नाव विचारतो. पण, हर्षवर्धन नाव सांगत नाही. पण, त्याचा रोख हा मुक्ताची बहीण मिहिकावर असतो. 

मुक्तासाठी सागरने आणलाय नवा ड्रेस...

दुसरीकडे सागर मुक्तासाठी  डिझायनर कडून एक महागडा ड्रेस मागवतो. सावनीला वाटतं की हर्षवर्धनने तिच्यासाठी हा ड्रेस पाठवला आहे. पण, डिलिव्हरी बॉय हा ड्रेस सागर कोळीच्या नावावर डिलिव्हरी असल्याचे सांगतो. तेव्हा सावनीचा चेहरा पडतो. दुसऱ्याच्या वस्तूंवर नजर टाकायची सवय गेली नाही वाटत. नशीब तू याला हात लावला नाही. अन्यथा मला हा ड्रेस रिजेक्ट करावा लागला असता असे सागर सांगतो. विख्यात  डिझायनर प्रतिभा मल्होत्राकडून ड्रेस मागवला असल्याचे सागर सांगतो. हे ऐकून सावनी विचारात पडते. एवढा महागडा ड्रेस सागरने  मुक्तासाठी मागवला, याचा विचार सावनी करते. 

सागर-मुक्तामध्ये प्रेमळ भांडणे

एवढा महागडा ड्रेस घेतलाय पण मुक्ता हा ड्रेस कसा परिधान करेल, तिला कसे राजी करायचे याचा विचार सागर करत असतो. मुक्ताने हा घेतलेला ड्रेस वेअर करावा यासाठी तो वेगवेगळ्या शकल लढवतो. सागर मुक्ताला म्हणतो की माझे मित्र म्हणतात की तुझी बायको तुला सूट होत नाही. ती तुझ्यापेक्षा वयाने मोठी वाटते. त्यावरून मुक्ताला वयस्कर म्हणून चिडवतो. मुक्ता आणि सागरची प्रेमळ भांडणे सुरू असतात. 

मुक्ताला ड्रेससाठी कस राजी करायचे याचा सागर विचार करतो. सागर मुक्ताला डोळे बंद करण्यासाठी सांगतो.पण मागील वेळी डोळे बंद करायला सांगितले तेव्हा सागरने कीस घेतलेले  सते. आताही सागर तसेच करेल असे मुक्ताला वाटते म्हणून ती लाजते. सागर आग्रह करत असतो. त्यावर मुक्ता म्हणते की, माझ्या क्लिनिकमध्ये माझे  पेशंट माझी वाट पाहत असतील त्यामुळे मी निघते आणि तुमचे सरप्राईज रात्री बघते. मुक्ताने तो ड्रेस न पाहताच गेल्यामुळे सागर नाराज होतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget