एक्स्प्लोर
पाच गर्लफ्रेण्ड्सना खुश करण्यासाठी चोऱ्या करणारा वृद्ध अटकेत
गेल्या 20 वर्षांपासून आरोपी बंधूराम चोऱ्या करत असून याआधीही अनेक वेळा त्याला बेड्या पडल्या आहेत
नवी दिल्ली : वय म्हणजे केवळ आकडे आहेत, हे दिल्लीतल्या 63 वर्षीय वृद्धाने चुकीच्या पद्धतीने सिद्ध केलं आहे. या वयात त्याला एक-दोन नव्हे तर पाच गर्लफ्रेण्ड्स आहेत. विशेष म्हणजे पाचही जणींना खुश ठेवण्यासाठी त्याने चोऱ्या करण्याचा पर्याय निवडला.
उत्तर दिल्लीतील एका फॅक्टरीमध्ये चोरी करताना बंधूराम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. चोरलेल्या मौल्यवान वस्तूंसह पोलिसांनी त्याला अटक केली. 60 हजारांच्या रकमेसह त्याने दोन लॅपटॉप, स्मार्ट एलईडी टीव्ही चोरला होता.
मौल्यवान वस्तू चोरुन बंधूराम आपल्या गर्लफ्रेण्ड्सना भेट द्यायचा. उर्वरित वस्तू विकून तो ऐशोआरामात जीवन जगत होता.
गेल्या 20 वर्षांपासून तो चोरी करत असे, आणि याआधीही अनेक वेळा त्याला बेड्या पडल्या आहेत.
मध्य दिल्लीतील आनंद पर्बत भागातील झोपडपट्टीत बंधूराम राहायचा. मंगोलपुरी भागात राहणाऱ्या कुटुंबापासून तो मुद्दामच विभक्त झाला. 28 ते 40 वर्ष वयोगटातील महिला हेरुन तो त्यांच्यासोबत रिलेशनशीप ठेवायचा.
संबंधित महिलांना आपल्या 'बॉयफ्रेण्ड'च्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पुसटशी कल्पनाही नव्हती. आपल्याशिवाय इतर महिलांसोबत त्याचे संबंध असल्याचीही त्यांना माहिती नसे, असं पोलिसांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement