एक्स्प्लोर
आधी प्रेयसीच्या लग्नात थिरकला, नंतर नवऱ्या मुलावर गोळीबार!
अलाहाबाद: अलाहाबादमध्ये एका माथेफिरु प्रियकरानं प्रेयसीच्या लग्नात जाऊन भर मंडपात तिच्या नवऱ्यावरच गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रियकरानं सगळ्यात आधी लग्नामध्ये शाहरुख खानच्या 'डर' सिनेमातील 'तू है मेरी किरन' या गाण्यावर डान्सही केला आणि जेव्हा वधू वरमाला गळ्यात घालणार त्याचवेळी त्यानं तिच्या नवऱ्यावर गोळीबार केला.
अलाहाबादमधील फुलपूर इथं ही घटना घडली आहे. गोळीबार केल्यानंतरही प्रियकर मंडपात गाणं गात राहिला. त्यानंतर वऱ्हाड्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरीकडे नवरदेवही गंभीर जखमी असून त्याची हालत नाजूक आहे. आरोपी का नवरीचा जवळचा नातेवाईक असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान त्याच्यावर देखील उपचार सुरु आहेत.
राम कैलाश भारती यांची मुलगी पूनम हीचं काल रात्री लग्न होतं. रात्री साडे अकराच्या दरम्यान नवरा मुलगा वरात घेऊन मंडपात पोहचला. तेव्हा आरोपी लल्लन हा देखील तिथं उपस्थित होता. नातेवाईक असल्यानं त्याला देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. लल्लननं डीजेवर जादू तेरी नजर गाणं वाजवण्यास सांगितलं आणि वऱ्हाडी मंडळींसोबत जोरदार डान्सही केला.
त्यानंतर रात्री एकच्या दरम्यान, जेव्हा नवरा-नवरी स्टेजवर पोहचले तेव्हा लल्लननं नवऱ्या मुलावर गोळ्या झाड्ल्या. त्यानंतर तिथेच उभं राहून तो 'डर' सिनेमातील गाणं गुणगुणत राहिला. त्यानंतर उपस्थितांनी आरोपीला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या हवाली केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लल्लन आणि नवरी पूनम यांच्या प्रेमसंबध होते. त्यांना लग्नही करायाचं होतं. मात्र, पूनमच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न मुकेशशी ठरवलं. त्यानंतर पूनमनं लल्लनला आपल्या आयुष्यातून दूर केलं. त्यामुळे लल्लन सारं काही विसरुन गेला असेल असं तिच्या घरच्यांना देखील वाटलं. त्यामुळेच त्याला लग्नाचं निमंत्रणही दिलं. लग्नात आलेल्या लल्लननं आपल्या मनात काय सुरु आहे याची कुणाला कुणकुणही लागू दिली नाही. त्यानं आपल्या मोबाइलमध्ये पूनमचं नाव किरन नावानेच सेव्ह केलं होतं. तो तिला त्याच नावाने हाक मारायचा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement