एक्स्प्लोर
प्रेयसीच्या छळाला कंटाळून प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या
![प्रेयसीच्या छळाला कंटाळून प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या Man Commits Suicide After Girlfriend Harassed Him With 351 Missed Calls प्रेयसीच्या छळाला कंटाळून प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/28092007/sacchi-ghatna-71-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
इंदूर: प्रेयसीच्या छळाला कंटाळून प्रियकरानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदूरमध्ये घडली आहे. हितेश नावाच्या या तरुणानं प्रेयसीच्या छळाला वैतागून गळफास घेतल्याचं वृत्त समजतं आहे.
हिेतेशच्या आत्महत्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याचा मोबाइल जेव्हा पाहिला त्यावेळी त्यांना धक्काच बसला. कारण की, त्याच्या मोबाइलवर त्याचा प्रेयसीचे तब्बल 351 मिस्ड कॉल होते.
हितेशनं प्रेयसीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. कारण की, सहा महिन्यापूर्वीच त्याच्यावर तिने बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला होता. असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
तिच्या या खोट्या केसमुळे हितेशला 1 महिना जेलमध्येही जावं लागलं होतं. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्यानंतर त्यानं प्रेयसीला भेटणं सोडून दिलं होती. पण त्यानंतर ती त्याला अधिकच छळू लागली. असंही कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
ती त्याला वारंवार फोन करायची. दिवसातून एक दोनदा नव्हे तर तब्बल 300 ते 400 फोन त्याला करायची. पोलिसांनी हितेशचा फोन ताब्यात घेतला असून ते यासंबंधी अधिक चौकशी करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)