एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update : महाराष्ट्र व्यापतोय दक्षिण पश्चिम मान्सून; पुढील आठवड्यात मुंबईत धडकण्याची शक्यता : IMD

Maharashtra Weather Update : हवामान विभागानं रविवारी दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दक्षिणेच्या काही आणखी भागांत, महाराष्ट्र आणि पुर्वेकडे पोहोचण्याची घोषणा केली. रविवारपर्यंत मान्सूनने महाराष्ट्राचा जवळपास तीस टक्के भाग व्यापला आहे. तसेच पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये प्रवेश केला आहे. तसेच पुढील आठवड्यापर्यंत मान्सून मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.

मुंबई : आज मुंबई आणि उपनगरांत पुढच्या काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. आज सकाळपासूनच मुंबईत काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु आहे. अशातच येत्या 3 ते 4 तासांत मुंबई आणि मुंबई उपनगरांत विजांच्या कडकडाटसह पाऊस कोसळणार आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

हवामान विभागानं रविवारी दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दक्षिणेच्या काही आणखी भागांत, महाराष्ट्र आणि पुर्वेकडे पोहोचण्याची घोषणा केली. रविवारपर्यंत मान्सूनने महाराष्ट्राचा जवळपास तीस टक्के भाग व्यापला आहे. तसेच पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये प्रवेश केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पुढील आठवड्यापर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सूननं काहीसं उशीरा केरळच्या किनाऱ्यावर धडक दिली होती. त्याचसोबत हवामान विभागानं सांगितलं की, मान्सूननं संपूर्ण केरळ व्यापला आहे. 

राज्यात मान्सूनचं आगमन 

सर्वजण वाट पाहणाऱ्या मान्सूनचं अखेर राज्यात आगमन झालंय. राज्यात मान्सून अलिबाग, रायगड, पुणे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पोहचला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शेतीकामाला वेग येणार आहे. तर दुसरीकडे पावसाळा येत असल्याने कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे.

राज्यात यंदा वेळेच्या आधी मान्सूनचं आगमन

काही दिवसांपासून केरळात दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. यंदा मान्सून केरळात सामान्य वेळेपेक्षा उशिरा पोहोचला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, केरळमध्ये वर्दी दिल्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. 11 जून रोजी महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, त्याआधीच मान्सून राज्यात दाखल झाल्याची माहिती हवामाने विभागाने दिलीय. केरळमध्ये सामन्यत: 1 जून रोजी मान्सून दाखल होतो. परंतु, यंदा दोन दिवस उशिरा वरुणराजाने हजेरी लावली. याआधी आयएमडीने  यंदा मान्सून केरळमध्ये 31 मे म्हणजेच चार दिवस आधी पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता.

येत्या 2 दिवसात देशाच्या बर्‍याच भागात पाऊस होण्याची शक्यता

येत्या दोन दिवसांत देशाच्या बर्‍याच भागात थोड्या-फार प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तविला गेला आहे. भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान वार्षिक पावसाच्या 70 टक्के पाऊस पडतो. यावर्षी हवामान खात्याकडून देशभरात सामान्य हंगामी पावसाची अपेक्षा आहे. आयएमडीनेही या जूनमध्ये सामान्य पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आयएमडीने सांगितले की, येत्या पाच दिवसांत देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही.

ताज्या अंदाजानुसार, आयएमडीने येत्या 5 दिवसांत ईशान्य राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात 10 जूनपर्यंत पावसाची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवस देशाच्या दक्षिण द्वीपकल्पित किनाऱ्यावर गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत देशाच्या वायव्य भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
Embed widget