एक्स्प्लोर
घरगुती गॅस सिलेंडरचे दर मार्च महिन्यात कमी होतील : धर्मेंद्र प्रधान
घरगुती सिलेंडरच्या किमती मार्च महिन्यात कमी होतील, असा विश्वास पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला. फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतींमुळे घरगुती सिलेंडरच्या किमतीत वाढ केल्याशिवाय पर्याय नव्हता असं प्रधान यांनी स्पष्ट केलं.

रायपूर : देशातील सामान्यांना पुढील महिन्यात महागड्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दराबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण मार्च महिन्यात एलपीजी सिलेंडरचे दर कमी होतील, असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे. दोन दिवसांच्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांनी स्वामी विवेकानंतर विमानतळावर माध्यमांशी साधलेल्या संवादात हे वक्तव्य केलं. घरगुती गॅस सिलेंडरचे सातत्याने वाढत असलेल्या दराविषयी बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, "एलपीजीचे दर सतत वाढत आहे, हे सत्य नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याने या महिन्यात दर वाढवावे लागले. पण पुढील महिन्यात दर कमी होण्याचे संकेत आहेत." "थंडीच्या दिवस एलपीजीची मागणी वाढते, परिणामी या क्षेत्रावरील दबाव वाढतो. या महिन्यात किमती जरी वाढल्या असतील, पण पुढील महिन्यात दर कमी होतीस," असं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात वाढ झाल्याने एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर 144.5 रुपयांची वाढ झाली होती. मात्र देशातील ग्राहकांवर याचा परिणाम होऊ नये, यासाठी सरकारने सिलेंडरवरील अनुदान जवळपास दुप्पट केलं आहे. विनाअनुदानित घरगुती सिलेंडर 149 रुपयांनी महाग 12 फेब्रुवारी रोजी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 149 रुपयांची वाढ झाली होती. इंडियन ऑईलच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये 14.2 किलोचा सिलेंडरचे दर 144.50 रुपयांनी वाढून 858.50 रुपयांवर पोहोचले होते. तर कोलकातामध्ये 149 रुपयांनी वाढून 896.00 रुपये आणि मुंबईकरांना 145 रुपये जास्त मोजावे लागत आहेत. इथे एका सिलेंडरचा दर आता 829.50 रुपये आहे. 12 सिलेंडरवर सरकारकडून अनुदान सध्या सरकार एका वर्षात प्रत्येक घरासाठी 14.2 किलोच्या 12 सिलेंडरवर अनुदान देतं. जर यापेक्षा जास्त सिलेंडरची गरज असेल तर तो बाजारभावाने खरेदी करावा लागतो. दरम्यान सरकार दरवर्षी 12 सिलेंडरवर जे अनुदान देतं, त्याचे दर महिन्यात बदलत राहतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम इथल्या सिलेंडरच्या दरांवर होतो. ऑगस्ट महिन्यात घरगुती गॅस सिलेंडर सुमारे 62 रुपयांनी स्वस्त झाला होता. यानंतर घरगुती गॅस सिलेंडर सुमारे 295 रुपयांपर्यंत महागला आहे. मागील तीन महिन्यातील गॅस सिलेंडरचे दर
आणखी वाचा























