एक्स्प्लोर

आधी भाजपला हरवायचं, नंतर नेता ठरवायचा, विरोधकांच्या एकीचा नवा फॉर्म्युला

अखिलेश आणि मायावतींच्या युतीने योगींना गोरखपूर आणि फुलपूरमध्ये पराभवाचा धक्का बसला. त्याची पुनरावृत्ती देशभर करण्यासाठी महाआघाडीचा प्रयत्न सुरु झाला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांचा पराभव करण्यात इगो आडवा येऊ नये, यासाठी नेतृत्वाचा मुद्दा गौण धरण्यावर विरोधकांमध्ये एकमत झालं आहे. तसेच, निवडणुकीनंतर नेतृत्वाचा निर्णय योगदानाच्या निकषावर घेता येईल असंही ठरलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी यासंदर्भात माहिती दिली. काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शरद पवारांची भेट घेऊन जवळपास तासभर चर्चा केली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी ही माहिती दिली. खासदार माजिद मेमन नेमके काय म्हणाले? “विरोधकांच्या एकीमध्ये सर्वात कळीचा मुद्दा नेतृत्त्वाचा असतो. यावेळी मात्र असं ठरलंय की, नेतृत्वाचा विषय आधी आणायचा नाही. आधी सगळ्यांनी एकत्र यायचं, भाजपला हरवणं हा मुख्य अजेंडा आहे.”, अशी माहिती खासदार माजिद मेमन यांनी दिली. तसेच, कुणाचं किती योगदान यांवर निकालानंतर नेतृत्वाची चर्चा होईल, असेही बैठकीत ठरल्याचे खासदार माजिद मेमन यांनी सांगितले. सोनिया गांधी यांची डिनर डिप्लोमसी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेत, 13 मार्च रोजी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआयएम, सीपीआय, तृणमूल काँग्रेस यांसह 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या डिनरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राजदचे तेजप्रताप यादव, बसपा नेते सतीश चंद्र, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, तारीक अन्वर, द्रमुकच्या कनिमोळी, राष्ट्रीय लोकदलाचे अजित सिंह, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, शरद यादव, आययूएमएलचे पी. के. कुन्हालीकुट्टी, एआययूडीएफचे बद्रुद्दीन अजमल, केरळ काँग्रेसचे जोस के. मणी, जनता दल सेक्युलरचे डी. कुपेंद्र रेड्डी आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांची उपस्थिती होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला हे नेतेही डिनरला हजर होते. दरम्यान, कालच अखिलेश आणि मायावतींच्या युतीने योगींना गोरखपूर आणि फुलपूरमध्ये पराभवाचा धक्का बसला. त्याची पुनरावृत्ती देशभर करण्यासाठी महाआघाडीचा प्रयत्न सुरु झाला आहे. संबंधित बातम्या : शरद पवारांच्या घरी जाऊन राहुल गांधींची खलबतं! मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी पोटनिवडणुकीचा निकाल 2019 पूर्वी भाजपसाठी धोक्याची घंटा! यूपीत योगींचा गड हादरण्यामागचं नेमकं कारण काय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Embed widget