लीप ईयर म्हणजे काय? फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस का असतात?
लीप ईयर कसं ओळखावं असा प्रश्ना तुम्हाला पडला असेल. तर साध्या सोप्या भाषेत ज्या वर्षाला चारने पूर्ण भाग जातो, ते लीप ईयर असतं.
मुंबई : आज लीप डे आहे, म्हणजे यावर्षी फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा आहे. ज्यावर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसांचा असतो, त्या वर्षाला लीप ईयरही म्हणतात. आज लीप डेनिमित्त गूगनेही खास डूडल बनवलं आहे. पृथ्वी सूर्याभोवती या परिभ्रमणाला जो वेळ लागतो त्यामुळे लीप डे हा एक दिवस वाढतो. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की, हे नेमकं कसं घडतं तर ते आपण जाणून घेऊयात.
पृथ्वी स्वत: भोवती फिरते यासाठी 24 तास लागतात, असं आपण मानतो. मात्र वैज्ञानिकदृष्ट्या ही वेळ 23 तास 56 मिनिट 4 सेकंट एवढी आहे. तर पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात, असं म्हटलं जातं. मात्र ती खरी वेळी 365 दिवस 5 तास 48 मिनिच आणि 5 सेकंद एवढी आहे.
सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस आणि जवळपास 6 तास लागतात. अशा प्रकारे जर हे 6 अतिरिक्त तास एकत्र केले गेले तर चार वर्षात 24 तास म्हणजे एक दिवस पूर्ण होतो. मग हा अधिकचा एक दिवस चौथ्या वर्षात लीप डे म्हणून समाविष्ट केला जातो.
Happy #LeapDay Here’s a reminder to jump up with joy this day. ????????#GoogleDoodle
→ https://t.co/fBGnzeT3rm pic.twitter.com/XSnCHVGFcs — Google India (@GoogleIndia) February 28, 2020
1583 मध्ये पोप गेग्रोरी यांनी ग्रेगोरियन कॅलेंडर बनवलं होतं. या कॅलेंडरमध्ये देखील दर चार वर्षांनी फेब्रुवारीमध्ये अधिकच्या एका दिवसाच समावेश केला होता. निसर्गाचं ताळमेळ ठीक राहावा यासाठी लीप ईयर महत्त्वाचं मानलं जातं.
आता लीप ईयर कसं ओळखावं, असा प्रश्ना तुम्हाला पडला असेल. तर साध्या सोप्या भाषेत ज्या वर्षाला चारने पूर्ण भाग जातो, ते लीप ईयर असतं. उदा. 2020 ला 4 ने पूर्ण भाग जातो म्हणून ते लीप ईयर आहे. याआधी 2016 लीप ईयर होतं. तर आता पुढतं लीप ईयर 2024 ला असणार आहे.