एक्स्प्लोर

Kolkata Doctor Rape and Murder Case : पश्चिम बंगाल सरकारवर 'सर्वोच्च' ताशेरे; डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी राष्ट्रीय टास्क फोर्सची नियुक्ती करणार

Kolkata Doctor Rape and Murder Case : राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. 'आम्ही डॉक्टरांना पुन्हा काम सुरू करण्याची विनंती करतो', असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कार्यपद्धती तयार करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. कोलकात्याच्या (Kolkata Doctor Rape and Murder Case) आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येशी संबंधित प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली. सुप्रीम कोर्टाने बंगाल सरकारला 'सर्वोच्च' शब्दात फटकारले आहे. “आपण हा राजकीय मुद्दा बनवू नये आणि मी WB राज्याला विनंती करतो की त्यांनी नकार देऊ नये. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. 'आम्ही डॉक्टरांना पुन्हा काम सुरू करण्याची विनंती करतो', असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सरन्यायाधीशांकडून प्रश्नांची सरबत्ती

सरन्यायाधीश चंद्रचू़ड म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची दखल घेतली कारण या प्रकरणावर एक राष्ट्रीय स्तरावर सार्वमत बनवण्याची आवश्यकता आहे. जर महिला नोकरीच्या ठिकाणी जाऊ शकणार नसेल तर घटनात्मक समानतेला अर्थ काय आहे? तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याचा विषय आहे. FIR इतक्या उशिरा का दाखल करण्यात आला? अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली? पीडिताच्या आई वडिलांना उशिरा मृतदेह देण्यात का आला? आणि त्याच रात्री हॉस्पिटलवर मॉबने हल्ला केला? पोलिस काय करत होते? क्राईम सीन सुरक्षित ठेवणे हे पोलिसांचे काम नाही का? अशा प्रश्नांची सरबत्तीच सरन्यायाधीशांनी केली. 

आम्ही डॉक्टरांना काम पुन्हा सुरू करण्याची विनंती करतो

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, “आम्ही डॉक्टरांना काम पुन्हा सुरू करण्याची विनंती करतो. जर रुग्णांनी आपला जीव गमावला तर? आम्ही डॉक्टरांना आवाहन करतो की त्यांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही येथे आहोत,” असेही सरन्यायाधीशांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालय डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कार्यपद्धती तयार करण्यासाठी राष्ट्रीय टास्क फोर्स तयार करणार आहे.

CJI चंद्रचूड म्हणाले की, “आम्ही एक राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन करत आहोत ज्यामध्ये विविध पार्श्वभूमीचे डॉक्टर असतील जे संपूर्ण भारतभर अनुसरण करण्याच्या पद्धती सुचवतील. जेणेकरुन कामाच्या सुरक्षिततेची परिस्थिती असेल आणि तरुण किंवा मध्यमवयीन डॉक्टर त्यांच्या कामाच्या वातावरणात सुरक्षित असतील.”

प्रकरण काय आहे?

9 ऑगस्ट रोजी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 31 वर्षीय पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संजय रॉयला अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे डॉक्टरांनी देशव्यापी निषेध केला, पीडितेला न्याय द्यावा आणि महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील सर्व निवासी डॉक्टरांसाठी सुरक्षितता सुनिश्चित करणारा कायदा करावा, अशी मागणी केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही टीएमसी सरकारने हे प्रकरण हाताळल्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागले आहे. यावेळी त्यांचा वैयक्तिक हस्तक्षेप आंदोलकांना शांत करण्यात अपयशी ठरला.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभा नामांकन रद्द करण्याविरोधातील मीनाक्षी नटराजनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; निवडणूक आयोगाचा उमेदवारी रद्दचा निर्णय योग्य की अयोग्य यावर न्यायालयाचे भाष्य नाही
राज्यसभा नामांकन रद्द करण्याविरोधातील मीनाक्षी नटराजनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; निवडणूक आयोगाचा उमेदवारी रद्दचा निर्णय योग्य की अयोग्य यावर न्यायालयाचे भाष्य नाही
Diesel Crisis: ऐन खरिप हंगामातच डिझेल खरेदीवर अटी शर्ती आल्याच! आता एकावेळी किती लिटर डिझेल खरेदी करता येणार?
ऐन खरिप हंगामातच डिझेल खरेदीवर अटी शर्ती आल्याच! आता एकावेळी किती लिटर डिझेल खरेदी करता येणार?
Arun Lakhani on PM Modi : 'महात्मा गांधींनी आवाहन केलं की देश ऐकायचा; मोदींमध्येही तीच ताकद', सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले ?
'महात्मा गांधींनी आवाहन केलं की देश ऐकायचा; मोदींमध्येही तीच ताकद', सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले ?
Devendra Fadnavis: लोक मंदी,मंदी,मंदी बोलत बसलेत, पण आज भारत 94 टक्के कर्ज एका दिवसात फेडू शकतो, तिजोरीत परकीय चलनाचा प्रचंड साठा: देवेंद्र फडणवीस
लोक मंदी,मंदी,मंदी बोलत बसलेत, पण भारत 94 टक्के कर्ज एका दिवसात फेडू शकतो, तिजोरीत परकीय चलनाचा प्रचंड साठा: देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: स्वत:च्याच मेडिकलमधून औषधं खरेदी करण्याचा हट्ट कराल तर याद राखा, तुकाराम मुंढेंनी लूटमार करणाऱ्या हॉस्पिटल्सकडे मोर्चा वळवला
स्वत:च्याच मेडिकलमधून औषधं खरेदी करण्याचा हट्ट कराल तर याद राखा, तुकाराम मुंढेंनी लूटमार करणाऱ्या हॉस्पिटल्सकडे मोर्चा वळवला
Jalna Crime : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत नववीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, जालन्यातील नराधम शिक्षकाला बेड्या 
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत नववीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, जालन्यातील नराधम शिक्षकाला बेड्या 
Sachin Tendulkar Viral Video: 'उंची कितीही असो, तुमचा दृष्टिकोन बदलता कामा नये' सचिन तेंडुलकरचा लेक सारासोबत विमानात भन्नाट व्हिडिओ
Video: 'उंची कितीही असो, तुमचा दृष्टिकोन बदलता कामा नये' सचिन तेंडुलकरचा लेक सारासोबत विमानात भन्नाट व्हिडिओ
तुकाराम मुंढे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; गुटखा विक्रेत्यांवर आता मकोका लागणार, FDI च्या अधिकाऱ्यांनाही इशारा
तुकाराम मुंढे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; गुटखा विक्रेत्यांवर आता मकोका लागणार, FDI च्या अधिकाऱ्यांनाही इशारा
न्यूझीलंड क्रिकेटमध्ये युगांत! केन विल्यम्ससनचा भर इंग्लंड दौऱ्यात क्रिकेटला अलविदा; त्याच्या कर्णधारपदात दोनवेळा वर्ल्डकप फायनल गाठली, भारताला हरवत कसोटी अजिंक्यपदही पटकावलं
न्यूझीलंड क्रिकेटमध्ये युगांत! केन विल्यम्ससनचा भर इंग्लंड दौऱ्यात क्रिकेटला अलविदा; त्याच्या कर्णधारपदात दोनवेळा वर्ल्डकप फायनल गाठली, भारताला हरवत कसोटी अजिंक्यपदही पटकावलं
संभाजीनगरमधील शिक्षकाच्या मृत्युचं गुढ कायम? पोलिसांकडून मारहाण झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, तपास सुरू
संभाजीनगरमधील शिक्षकाच्या मृत्युचं गुढ कायम? पोलिसांकडून मारहाण झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, तपास सुरू
Pune News : पुण्यात ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली चालणारे बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त! दररोज 400 जणांची फसवणूक; दुबई कनेक्शन उघड
पुण्यात ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली चालणारे बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त! दररोज 400 जणांची फसवणूक; दुबई कनेक्शन उघड
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ का झाली? प्रमुख कारणं
आठवड्याचा शेवट गोड झाला, सेन्सेक्स आणि निफ्टीत तुफान तेजी, शेअर बाजारातील वाढीची प्रमुख कारणं कोणती?
Embed widget