एक्स्प्लोर
तुमच्याकडे फाटक्या नोटा असतील तर किती रुपये परत मिळतील?
आरबीआयने ‘नोट परतीची नियमावली 2009’ जारी करुन, सामान्य जनतेला आपल्या फाटक्या नोटा बदलण्याचा पर्याय दिला आहे.
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने फाटक्या नोटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे फाटक्या नोटा असणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
आरबीआयने ‘नोट परतीची नियमावली 2009’ जारी करुन, सामान्य जनतेला आपल्या फाटक्या नोटा बदलण्याचा पर्याय दिला आहे.
नव्या नियमानुसार फाटक्या नोटा जसे की नोटाचा काही भाग फाटला असेल, दोन तुकडे जोडले असतील, तर त्या बदलता येतील.
फाटक्या नोटांच्या बदल्यात किती पैसे परत मिळतील?
- भारतीय रिझर्व्ह बँक नियमावली, 2009 नुसार जर तुमच्याकडे फाटलेल्या 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांच्या नोटा असतील, आणि त्या 50 टक्क्यांपेक्षा कमी फाटल्या असतील, तर बँक तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे परत देईल.
- जर 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नोट 50 टक्क्यांपेक्षा जास्त फाटली असेल, तर बँका तुम्हाला त्याचे काहीही पैसे देणार नाहीत.
- याचप्रमाणे 50 किंवा त्यापेक्षा जास्त मूल्यांच्या नोटा जर 35 टक्केपेक्षा कमी फाटली असेल, तर पूर्ण पैसे मिळतील.
- तर 50 किंवा त्यापेक्षा जास्त मूल्यांच्या नोटा जर 35 टक्केपेक्षा जास्त फाटल्या असतील, तर पूर्ण पैसे मिळणार नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement