(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pulwama terror attack : जम्मू काश्मीर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणांना केलेलं अलर्ट
गुरुवारी 3 वाजून 37 मिनिटांनी हा हल्ला झाला होता. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एका ट्विटर अकाउंटवर अपलोड करण्यात आलेली गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली होती. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद सुरक्षा दलावर हल्ला करणार असल्याची धमकी यामधून देण्यात आली होती.
जम्मू काश्मीर पोलिसांना एका ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ मिळाला होता. 33 सेकंदांचा हा व्हिडीओ होता. या व्हिडीओमध्ये दहशतवाद्यांनी सोमालियाच्या सैनिकांवर हल्ला केल्याचं दिसत होतं. या व्हिडीओतील हल्ल्याप्रमाणेच गुरुवारी पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे या व्हिडीओला गंभीरतेने घेण्यात आलं असतंं तर ही दुर्दैवी घटना रोखता आली असती, असं बोललं जात आहे.
तसेच दहशतवाद्यांना सीआरपीएफच्या जवानाच्या हालचालीची माहिती मिळाली असावी. त्यामुळेच दहशतवाद्यांनी एवढा मोठा हल्ला घडवून आणला. सुरक्षेत नक्की काय चूक झाली हे तपासानंतर पुढे येईल.
गुरुवारी 3 वाजून 37 मिनिटांनी हा हल्ला झाला होता. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
‘जैश’चा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. आदिल हा काकापोरा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता. आदिलच्या गाडीने जवानांच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे मोठा स्फोट झाला.
व्हिडीओ
संबधित बातम्या Pulwama terror attack : देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं : शरद पवार Pulwama terror attack : सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यावर विकी कौशल म्हणतो... Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद