एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इस्रोचा सर्वात विशाल उपग्रह जीसॅट 19 चं आज प्रक्षेपण
चेन्नई : आज इस्रो आपल्या जीसॅट 19 या उपग्रहाला लॉन्च करणार आहे. काल रविवारी उपग्रहाच्या लॉन्चिंगचं काऊंटडाऊन सुरु कऱण्यात आलं आहे. या मोहिमेमुळे अंतराळात मानव पाठवणं भारतालाही शक्य होणार आहे. त्यामुळेच भारताच्या या मोहिमेकडे जगाचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी 5.28 वाजता श्रीहरीकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाईल. 3136 किलो वजनाच्या जीसॅट 19 च प्रक्षेपण एमके3 डी1 या रॉकेटच्या साहाय्यानं केलं जाणार आहे.
इस्रोनं आपल्या या मोहिमेसाठी केद्रांची परवानगी आणि 12500 कोटींच्या बजेटचा प्रस्तावही ठेवला आहे. ज्याची क्रू मॉड्यूल टेस्ट इस्रोनं 2014 मध्येच यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
अंतराळात मानव पाठवण्यात आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन यशस्वी झाले आहेत. आता भारतही लवकरच या देशांच्या पंगतीमध्ये बसेल. मात्र अंतराळात माणूस पाठवण्याची मोहिम पूर्ण होण्यास भारताला सात वर्षं वाट पाहावी लागणार आहे.
जीसॅट 19 हा जिओ स्टेशनरी कम्युनिकेशन उपग्रह आहे, ज्याचं वजन तब्बल 3136 किलो आहे. इस्रोनं अंतराळात पाठवलेल्या उपग्रहांपैकी आजवरचा सर्वात वजनदार उपग्रह आहे.
जीसॅट 19 ची वैशिष्ट्य:
तीन टनांहून अधिक वजन
स्पेस रिसर्च सेंटर अहमदाबादमध्ये निर्मिती
भारतानं बनवलेला आजवरचा सर्वात मोठा आणि वजनदार उपग्रह
भारतात बनवलेल्या लीथियम आयऑन बॅटरींवर चालेल
नव्या अत्याधुनिक प्रणालीमुळे मल्टिपल फ्रिक्वेंसी बीमच्या वापरातून इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement