GAGAN : स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीम 'गगन'चा वापर यशस्वी, 'इंडिगो' ठरली लॅंडिंग करणारी पहिली एअरलाइन
GPS-aided GEO augmented navigation : 'गगन' (GAGAN) या भारताच्या स्वतःच्या उपग्रहावर आधारित नेव्हिगेशन सिस्टमद्वारे प्रथमच 'इंडिगो' (Indigo) विमानाचं यशस्वी लॅंडिंग झालं आहे.
GPS-aided GEO augmented navigation : 'गगन' (GAGAN) म्हणजेच जीपीएस (GPS) सहाय्यित GEO ऑगमेंटेड नेव्हिगेशन नावाच्या भारताच्या स्वतःच्या उपग्रहावर आधारित ऑगमेंटेशन सिस्टमद्वारे प्रथमच विमानाचे लॅंडिंग यशस्वी झालं आहे. राजस्थानमधील अजमेरजवळील छोट्या विमानतळावर या स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीमची चाचणी झाली. यामुळे भारत आता यूएस, जपान आणि युरोप या गटात सामील झाला आहे. स्वदेशी नेव्हिगेशन एअरक्राफ्ट ऑपरेशन सिस्टीम 'गगन' वापरून विमान उतरवणारी 'इंडिगो' ही देशातील पहिली एअरलाइन बनली आहे. यासह भारत आशियातील पहिला देश बनला आहे ज्याकडे स्वत:ची स्वदेशी नेव्हिगेशन एअरक्राफ्ट ऑपरेशन सिस्टीम आहे.
इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजस्थानमधील किशनगड विमानतळावर बुधवारी सकाळी ATR-72 विमान GPS-सहाय्यित जिओ-ऑगमेंटेड नेव्हिगेशन (GAGAN) वापरून उतरवण्यात आलं. केंद्राच्या विमानतळ प्राधिकरणाने (AAI) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांनी संयुक्तपणे ही नेव्हिगेशन प्रणाली विकसित केली आहे.
#AAI has achieved a major milestone in Indian #CivilAviation. AAI has successfully applied the latest technology in Air Navigation Services #ANS in a flight trial at #Kishangarh @aaiksgairport. India is the first country in Asia Pacific Region to achieve this. pic.twitter.com/iPG9Gh0QTO
— Airports Authority of India (@AAI_Official) April 28, 2022
विमानाच्या लँडिंगसाठी धावपट्टीजवळ येत असताना मार्गदर्शनासाठी 'गगन' प्रणाली वापरली जाते. त्याची अचूकता विशेषतः इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) स्थापन नसलेल्या लहान विमानतळांसाठी उपयुक्त आहे. गगन भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे आधुनिकीकरण करेल, उड्डाणाला होणार विलंबही कमी करेल. यासह इंधन वाचवेल आणि उड्डाणाची सुरक्षाही सुधारेल, असे निवेदनात सांगण्यात आलं आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 1 जुलै 2021 नंतर भारतात नोंदणीकृत सर्व विमानांना GAGAN सिस्टीम सुसज्ज करण्याचा आदेश जारी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Nandan Nilekani : अमेरिकन कंपन्यांविरोधात सरकारची मोहीम, अॅमेझॉन आणि वॉलमार्टपासून भारतीय दुकानदारांना वाचवणार नंदन निलेकणी
- Twitter : ट्विटरकडून युजर्स मोजण्यात झालेली चूक मान्य, सांगितलं 'हे' कारण
- Afghanistan Blast : दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं अफगाणिस्तान, 13 जण जखमी तर 9 लोकांचा मृत्यू
- Indonesia Palm Oil Ban : इंडोनेशियाच्या खाद्यतेलाच्या निर्यातीवरील बंदीचा परिणाम, देशात पामतेलाचे दर कडाडले