एक्स्प्लोर

Afghanistan Blast : दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं अफगाणिस्तान, 13 जण जखमी तर 9 लोकांचा मृत्यू

Afghanistan Blast : अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतातील शहर मजार-ए-शरीफमध्ये बसमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. या बॉम्बस्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत.

Afghanistan Blast : अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतातील शहर मजार-ए-शरीफजवळ बसमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. या बॉम्बस्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, दोन्ही बॉम्बस्फोटांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला लक्ष्य करण्यात आलं. मृतांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू असल्याचं प्रांतीय आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या बॉम्बस्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटानं स्वीकारलेली नाही.

अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक स्फोट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मजार-ए-शरीफमध्येच, 21 एप्रिल (गुरुवार) दुपारच्या नमाजच्या वेळी सेह डोकान मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता आणि 58 लोक जखमी झाले होते. दहशतवादी संघटना इसिसने (ISIS) या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. शिया मशिदीवर बॉम्ब हल्ल्याची योजना आखणाऱ्या इसिसच्या संशयित दहशतवाद्याला तालिबानी सैन्याने अटक केली.

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये 21 एप्रिल रोजी रस्त्याच्या कडेला झालेल्या स्फोटात दोन मुले जखमी झाली. शियाबहुल भागाजवळ हा स्फोट झाला. याच्या दोन दिवसांपूर्वी याच परिसरात शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करून अनेक स्फोट घडवण्यात आले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे सहा मुलांचा मृत्यू झाला आणि 17 जण जखमी झाले. अब्दुल रहीम शहीद हायस्कूलमध्ये आणि काबूलजवळील शियाबहुल भागातील दश्त-ए-बरची येथील मुमताज एज्युकेशन सेंटरजवळ हे बॉम्बस्फोट झाले. 22 एप्रिल रोजी कुंदुझच्या उत्तरेकडील प्रांतातील एका मशिदीत स्फोट होऊन यात 33 लोक मारले गेले.

तालिबानच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित
तालिबानने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्ता हाती दावा करण्यात येत आहे की, त्यांनी देश सुरक्षित केला आहे. परंतु आंतरराष्ट्रीय संस्था आणि विश्लेषक तालिबानच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद पुन्हा डोकं वर काढण्याचा धोका आहे. इस्लामिक स्टेट या अतिरेकी गटाने अनेक मोठ्या हल्ल्यांचा दावा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget