Indonesia Palm Oil Ban : इंडोनेशियाच्या खाद्यतेलाच्या निर्यातीवरील बंदीचा परिणाम, देशात पामतेलाचे दर कडाडले
Indonesia Palm Oil Ban : इंडोनेशियाने सर्व खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे भारतीय घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत.
Indonesia Palm Oil Ban : इंडोनेशियाने कच्च्या खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. 28 एप्रिलपासून इंडोनेशियाने याची अंमलबजावणी सुरु केली आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे. इंडोनेशियाने घातलेल्या बंदीमुळे भारतीय घाऊक बाजारपेठेत पामतेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिल्लीतील घाऊक बाजाराच खाद्यतेलाच्या किमतीत लाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किमती आठ रुपये प्रतिलिटरने वाढल्या आहेत.
दरम्यान, दिल्लीतील घाऊक विक्रेत्यांनी ही दरवाढ कायम स्वरूपी नसून काही काळासाठी असल्याचं म्हटलं आहे. एबीपी न्यजने दिल्लीतील घाऊक विक्रेत्यांशी संवाद साधताना विक्रेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, 'इंडोनेशियाने घातलेल्या बंदीनंतर खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र ही दरवाढ काही काळासाठी असण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाच्या बंदीनंतर खाद्यतेलाची आयात बंद झाल्यामुळे अधिक त्रास युक्रेन-रशिया संकटामुळे जाणवत आहे. युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे तेथून सूर्यफुलाच्या तेलाची आयात फारच कमी म्हणजे नगण्य आहे. यामुळे इतर खाद्यतेलांवरही त्याचा परिणाम होत आहे.'
खाद्यतेलाचे दर खाली येतील : घाऊक विक्रेते
दिल्लीच्या नया बाजार येथील घाऊक व्यापारी रवींद्र गुलाटी यांनी सांगितले की, खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. पण चांगली गोष्ट म्हणजे ही किंमत आता सर्वोच्च पातळीवर पोहोचली असून आता हळूहळू भाव उतरायला सुरुवात होईल. त्यांच्या मते, भाववाढीचे प्रमुख कारण म्हणजे लोक आता हळूहळू पाम तेलाचा पर्याय शोधू लागले आहेत. गुलाटी यांचा अंदाज आहे की पुढील तीन महिन्यांत भारतात खाद्यतेलांच्या किमती लक्षणीयरीत्या घसरतील. इंडोनेशियाच्या निर्यातीवरील बंदी जास्त कायमस्वरूपी राहणार नाही, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Nandan Nilekani : अमेरिकन कंपन्यांविरोधात सरकारची मोहीम, अॅमेझॉन आणि वॉलमार्टपासून भारतीय दुकानदारांना वाचवणार नंदन निलेकणी
- Twitter : ट्विटरकडून युजर्स मोजण्यात झालेली चूक मान्य, सांगितलं 'हे' कारण
- Afghanistan Blast : दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं अफगाणिस्तान, 13 जण जखमी तर 9 लोकांचा मृत्यू