एक्स्प्लोर

Nandan Nilekani : अमेरिकन कंपन्यांविरोधात सरकारची मोहीम, अ‍ॅमेझॉन आणि वॉलमार्टपासून भारतीय दुकानदारांना वाचवणार नंदन निलेकणी

Nandan Nilekani : अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि वॉलमार्टने (Walmart) भारतातील 80 टक्के ऑनलाइन रिटेल मार्केट काबीज केलं आहे. यामुळे छोट्या दुकानदारांना आपला उदरनिर्वाह धोक्यात येण्याची भीती आहे.

Nandan Nilekani Aims to Protect India Retail : सध्या भारतील रिटेल मार्केटमध्ये अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि वॉलमार्ट (Walmart) सारख्या अमेरिकन कंपन्यांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. याच्या अनुषंगाने भारतीय दुकानदारांच्या भवितव्यासाठी  आयटी कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि आधार योजनेचे सूत्रधार नंदन निलेकणी आता आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहेत. किरकोळ दुकानदारांसाठी निलकेणी यांनी सरकारसोबत हातमिळवणी केली आहे. देशातील एक लाख कोटी किरकोळ बाजारात वॉलमार्ट आणि अ‍ॅमेझॉन सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी लहान खरेदीदारांना मदत करणारे खुले तंत्रज्ञान नेटवर्क तयार करण्यात ते सरकारला मदत करत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत एक ऑनलाइन प्रणाली तयार करण्याचा आहे जिथे दुकानदार आणि ग्राहक साबणापासून ते विमान तिकिटांपर्यंत सर्व काही विकू शकतील. यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचे वर्चस्व कमी करणे हा आहे. फ्लिपकार्ट वॉलमार्टच्या मालकीची कंपनी आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अ‍ॅमेझॉन आणि वॉलमार्टने भारतात 24 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांनी प्रचंड सवलती आणि ऑफर्ससह भारतातील 80 टक्के ऑनलाइन रिटेल मार्केट काबीज केलं आहे. देशाच्या एकूण किरकोळ बाजारात ऑनलाइन कॉमर्सचा वाटा केवळ सहा टक्के असला तर भविष्यासाठी हे धोकादायक ठररु शकते. छोट्या दुकानदारांना भविष्यात आपला उदरनिर्वाह धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. सरकारलाही याची चिंता आहे. यामुळेच सरकारने या संदर्भात पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकारने नव्या नेटवर्कला ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) असं नाव दिलं आहे.

सरकार स्वतःची ई-कॉमर्स इकोसिस्टम बनवणार
नव्या नेटवर्कमुळे लहान दुकानदार आणि किरकोळ विक्रेत्यांना समान संधी उपलब्ध होतील. अशी संधी देणारा हा जगातील पहिलाच उपक्रम आहे. म्हणजेच सरकार सर्व लोकांसाठी स्वतःची ई-कॉमर्स इकोसिस्टम बनवणार आहे. खरेदीदारांची तक्रार आहे की Amazon आणि Walmart सारख्या कंपन्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विशिष्ट विक्रेत्यांना प्राधान्य देतात. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, निलेकणी यांनी सांगितलं की, 'ही एक कल्पना आहे. लाखो लहान खरेदीदारांना डिजिटल कॉमर्सच्या नवीन क्षेत्रात सहभागी होण्यासाठी आम्ही एक सोपा मार्ग निर्माण करण्याची आमची इच्छा आहे.'

हे सरकारी नेटवर्क पुढील महिन्यात निवडक पाच शहरांमध्ये निवडक वापरकर्त्यांसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केलं जाऊ शकते. अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले की, ते सध्या नेटवर्कला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्यामध्ये काही भूमिका बजावू शकतात का हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. फ्लिपकार्टने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताच्या रिटेल मार्केटवर वर्चस्व गाजवण्यासाठी जगातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. देशात सुमारे 800 दशलक्ष स्मार्टफोन वापरकर्ते आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Embed widget