(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Twitter : ट्विटरकडून युजर्स मोजण्यात झालेली चूक मान्य, सांगितलं 'हे' कारण
Twitter Overcounted Users : ट्विटरनं असं सांगितलं आहे की, गेल्या तीन वर्षांपासून युजर्सची मूळ संख्या तांत्रिक त्रुटीमुळे मोजण्यात आलेल्या युजर्सपेक्षा मूळ युजर्सची संख्या कमी होती.
Twitter Overcounted Users : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरकडून युजर्स मोजण्यात चूक झाली आहे. ट्विटरकडून मूळ युजर्सपेक्षा अधिक युजर्सची गणना झाली आहे. ट्विटरनं असं सांगितलं आहे की, गेल्या तीन वर्षांपासून युजर्सची मूळ संख्या तांत्रिक त्रुटीमुळे चुकून जास्त संख्या मोजण्यात येत आहे. ट्विटरकडून मोजण्यात आलेल्या युजर्सपेक्षा मूळ युजर्सची संख्या कमी होती. ट्विटर कंपनी कबूल केले आहे की तांत्रिक त्रुटीमुळे युजर्सची संख्या मूळ युजर्सपेक्षा अधिक दिसते. ट्विटरला वाटलं त्यापेक्षी कमी युजर्स आढळून आले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ही अडचण येत असल्याचंही ट्विटरने कबूल केलं आहे. याबाबत अधिक माहिती देत ट्विटरने सांगितले की तांत्रिक त्रुटीमुळे लिंक केलेली युजर्सचे खाते एकापेक्षा अधिक वेळा मोजलं जातात.
ट्विटर युजर्सची संख्या 16 टक्क्यांनी वाढली
ट्विटरचा मार्च तिमाहीचा नफा 513 दशलक्ष डॉलर झाला होता. या आठवड्यात सोमवारी अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा करार केला. ट्विटरने गुरुवारी सांगितले की, जानेवारी ते मार्च दरम्यान कंपनीचा महसूल 16 टक्क्यांनी वाढून 1.2 अब्ज डॉलर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अहवाल कालावधीत ट्विटर युजर्सची संख्या 16 टक्क्यांनी वाढली आहे. सक्रिय वापरकर्त्यांची दैनिक सरासरी संख्या 229 दशलक्ष आहे.
एलॉन मस्क यांच्या मालकीचं ट्विटर
ट्विटर बोर्डाने मस्कची सुमारे 44 अब्ज डॉलरचा करार मंजूर केला आहे. मस्क यांना लवकरच ट्विटरची पूर्ण मालकी मिळेल. हा करार या वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अद्याप शेअर होल्डर्स आणि अमेरिकन नियामकांनी यासाठी मान्यता दिलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- Elon Musk Twitter Deal : ट्विटरचं 'पाखरू' अखेर एलॉन मस्क यांच्या हाती; कराराबाबत 'या' 10 खास गोष्टी
- Nandan Nilekani : अमेरिकन कंपन्यांविरोधात सरकारची मोहीम, अॅमेझॉन आणि वॉलमार्टपासून भारतीय दुकानदारांना वाचवणार नंदन निलेकणी
- MPSC Exam 2021 : मोठी बातमी! एमपीएससी मुख्य परीक्षेचं प्रवेश प्रमाणपत्र जारी
- Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी असं खा पनीर, जाणून घ्या फायदे