एक्स्प्लोर
Advertisement
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं खास डुडल
आज भारतात 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने गुगलनेही खास डुडलद्वारे मानवंदना दिली आहे.
मुंबई : आज भारतात 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने गुगलनेही खास डुडलद्वारे मानवंदना दिली आहे. जागतिक पातळीवरील अनेक मोठ्या घटनांच्या, दिग्गजांच्या वाढदिवस आणि स्मृतीदिनाच्या दिवशी गुगलद्वारे खास डुडल तयार करण्यात येते. यावेळी गुगलने भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खास डुडल तयार केले आहे.
ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले. त्यानिमत्ताने 26 जानेवारी हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ देशभर साजरा केला जातो. 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता.
भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून विविध देशातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याची परंपरा सुरू झाली. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो भारताचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. गेल्या वर्षी इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींसह आग्नेय आशियातील 10 देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement