एक्स्प्लोर
पाकचे 40 जवान ठार, चार चौक्या उद्ध्वस्त
श्रीनगर : भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. मात्र भारतीय सैनिकही पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत आहे.
भारतात दिवाळी साजरी होत असताना, तिकडे जवानांनी पाकिस्तानची पळता भुई थोडी केली. बीएसएफने पाकिस्तानचे एक-दोन नव्हे तर तब्बल 40 जवानांचा खात्मा केला. दिवाळीच्या आदल्या दिवशी बीएसएफने ही धडाकेबाज कारवाई केली.
सध्या सीमेवर अजूनही तणाव आहे. भेदरलेल्या पाकिस्तानने रेंजर्सना हटवून आता सीमेवर आर्मीचे जवान आणले आहेत.
दरम्यान पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवान मनदीप सिंह आणि नितीन कोळी शहीद झाले होते. त्याचा बदला बीएसएफने घेतला.
बीएसएफच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सीमेवर मोठी ताकद लावत आहे. मात्र भारताच्या उत्तराने पाकिस्तान सैरभैर झालं आहे. बीएसएफने पाकिस्तानच्या 4 चौक्या उद्ध्वस्त करत, जवळपास 40 जवानांना यमसदनी धाडलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बीड
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement