हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, दिल्लीत कडाक्याची थंडी; 'या' राज्यांमध्ये पावसाचा इशारा
डोंगराळ भागात बर्फवृष्टी (Snowfall) झाल्यानंतर मैदानी भागात थंडी वाढली आहे. राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी सुरू झाली आहे.
![हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, दिल्लीत कडाक्याची थंडी; 'या' राज्यांमध्ये पावसाचा इशारा India weather Chance of rain in some states of country Snowfall in Himachal cold weather in Delhi हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, दिल्लीत कडाक्याची थंडी; 'या' राज्यांमध्ये पावसाचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/17/7a63b809581071fa9a9cffd758d3a2a4170279607044877_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Weather Update : डोंगराळ भागात बर्फवृष्टी (Snowfall) झाल्यानंतर मैदानी भागात थंडी वाढली आहे. राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. पहाटेपासूनच येथे धुके दिसून येते. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासात दक्षिणेकडील तमिळनाडू आणि केरळमध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबादमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच, आज (17 डिसेंबर) हिमाचल प्रदेशातील अनेक भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, काल कमाल तापमान 25 अंश, तर किमान तापमान 7 अंश राहण्याचा अंदाज आहे. 21 डिसेंबरपर्यंत किमान तापमान 5 अंश आणि कमाल तापमान 23 अंश असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यासोबतच येत्या काही दिवसांत दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळी हलके धुके पडण्याची शक्यता आहे.
राजधानीतील प्रदूषणाची पातळी अजूनही अत्यंत खराब श्रेणीत आहे. इथे शनिवारी सरासरी AQI 285 म्हणजेच अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आला. शून्य आणि 50 मधील AQI 'चांगला' मानला जातो, 51 आणि 100 मधील AQI 'समाधानकारक', 101 आणि 200 'मध्यम', 201 आणि 300 'खराब', 301 आणि 400 'अत्यंत खराब' आणि 401 आणि 5 मधील 'गंभीर' श्रेणीत गणले जाते.
पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत पंजाब, हरियाणा-चंडीगढ-दिल्ली, उत्तर प्रदेशच्या काही भागांत 4 ते 8 अंश सेल्सिअस आणि उत्तर राजस्थानच्या अनेक भागांत 8 ते 11 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. याशिवाय दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 17 डिसेंबर रोजी राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
उत्तर भारत गारठला! शिमल्यापेक्षा दिल्लीत कमी तापमानाची नोंद; पुढील पाच दिवस कसं असणार हवामान?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)