उत्तर भारत गारठला! शिमल्यापेक्षा दिल्लीत कमी तापमानाची नोंद; पुढील पाच दिवस कसं असणार हवामान?
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) उत्तर भारतातील अनेक राज्यातील किमान तापमानात घट होत आहे. दिल्लीतही कमी तापमानाची नोंद झाली आहे.
Weather News : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं थंडीचा कडाका (Cold Weather) तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात हलका पाऊस पडत असल्याचंही चित्र दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) उत्तर भारतातील अनेक राज्यातील किमान तापमानात घट होत आहे. दिल्लीतील (Delhi) किमान तापमान 4.9 अंश सेल्सिअसवर गेलं आहे. दिल्लीतील किमान तापमान शिमल्यापेक्षाही कमी आहे. शिमल्यातील आजचं किमान तापमान 6.8 अंश सेल्सिअसपर्यंत गेलं आहे.
हरियाणातील हिसारमध्ये 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
पंजाबमधील अनेक शहरांमध्ये दृश्यमानता घटली आहे. हरियाणातील हिसारमध्ये 4.2 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. एकापाठोपाठ एक वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानात घट होत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
पुढील पाच दिवस थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसात देशभरातील किमान तापमानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित नाही. आठवड्याच्या शेवटी दिल्लीत किमान तापमान 6 किंवा 7 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सकाळी हलके धुके पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कमाल तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असून आठवड्याच्या शेवटीही ते असेच राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
या भागात थंडी वाढली
हिसारबरोबरच उत्तर प्रदेशातील बरेली येथेही किमान तापमान 4.6 अंश नोंदवले गेले. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही ठिकाणांपेक्षा राष्ट्रीय राजधानी थंड होती. जसे की शिमला, आज सकाळी किमान तापमान 6.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मसूरी येथे किमान तापमान 6.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राजस्थानच्या काही भागात दिल्लीपेक्षा जास्त किमान तापमान नोंदवले गेले. यापैकी चुरुमध्ये 7.4 अंश, तर जोधपूरमध्ये किमान तापमान 10.3 अंशांवर नोंदवले गेले.
उत्तर आणि वायव्येकडून वाहणारे थंड वारे थंडीसाठी कारणीभूत
भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील किमान तापमान सामान्यपेक्षा कमी आहे. उत्तर आणि वायव्येकडून वाहणारे थंड वारे यासाठी कारणीभूत आहेत. हे वारे उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात पोहोचत आहेत. IMD च्या अंदाजानुसार, चालू आठवड्याच्या अखेरीस जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तुरळक पाऊस किंवा हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दिल्लीतही तापमानात घट होण्याची खात्री आहे. बुधवारी दिल्लीचे किमान तापमान 7.4 अंश सेल्सिअस, मंगळवारी 6.8 अंश सेल्सिअस आणि सोमवारी 6.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Pune Weather Update : पुणे गारठणार! 18 डिसेंबरपासून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता