एक्स्प्लोर

Coal Crisis Likely: देशात पुन्हा 'कोळसा संकट' होणार निर्माण?

Coal India: देशात यावर्षीही कोळशाचे संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक सरकारी कंपनी कोल इंडिया वीज प्रकल्पांना कोळसा पुरवठा करण्यास प्राधान्य देत आहे.

Coal India: देशात यावर्षीही कोळशाचे संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक सरकारी कंपनी कोल इंडिया वीज (Coal India) प्रकल्पांना कोळसा पुरवठा करण्यास प्राधान्य देत आहे, ज्यामुळे कोळशावर अवलंबून असलेल्या अशा उद्योगांसमोर पुरवठा संबंधित संकट निर्माण झालं आहे.

उन्हाळा ऋतू सुरू झाला असून अशा परिस्थितीत विजेची मागणी वाढली आहे. येत्या काळात विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोळशाचा साठा वीज प्रकल्पांमध्ये निर्धारित लक्ष्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे कोल इंडिया वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा वाढवत आहे. रविवारी ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा 25.2 दशलक्ष टनांवर आला होता. जो कोळसा मंत्रालयाने निर्धारित केलेल्या 45 दशलक्ष टनांच्या लक्ष्यापेक्षा कमी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोल इंडिया नॉन पॉवर वापरकर्त्यांना 2,75,000 टन कोळशाचा पुरवठा करत होती. ज्यात दररोज सरासरी 17 टक्क्यांनी घट झाली आहे. पॉवर प्लांटमध्ये कोळशाचा पुरवठा वाढवण्यासाठी रेल्वेचा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत कोल इंडियाने औद्योगिक ग्राहकांना रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याने ट्रकमधून कोळसा पुरवठा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नॉन पॉवर वापरकर्त्यांच्या कोळशाच्या पुरवठ्यात घट होणार आहे. एका रेल्वेमध्ये 4000 टन कोळसा वाहून नेण्याची क्षमता असते तर ट्रकमध्ये एकावेळी फक्त 25 टन कोळसा वाहून नेता येतो. अ‍ॅल्युमिनियम, स्टील, सिमेंट प्लांट्स व्यतिरिक्त रासायनिक कारखानेही देशात कोळशावर आधारित आहेत.

दरम्यान, 2021-22 कोल इंडियाने 622 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन केले आहे. जे 2020-21 मध्ये 607 दशलक्ष टन होते. मात्र कोळशाची मागणीत वाढ झाली आहे. रशियन-युक्रेनियन युद्धामुळे कोळशाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे आयात कोळशावर अवलंबून असलेल्या वीज प्रकल्पांनी त्यांची खरेदी कमी केली आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
Embed widget